IMPIMP

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, पुण्यात 1000 मल्ल मोहोळांचा करणार प्रचार

100 Malla Muralidhar Mohol will campaign for the Pune Lok Sabha Elections

पुणे :  मूळचे पैलवान असलेले आणि आता भाजपा महायुतीकडून पुणे लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले पै. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो मल्ल पुण्यात शड्डू ठोकणार आहेत. आपल्यातीलच एका पैलवानाला थेट लोकसभेसाठी संधी मिळाल्याने विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार यावेळी पुणे आणि परिसरातील मल्लांनी एकदिलाने करण्यात आला. पै. मोहोळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी घर ना घर पिंजून काढू असा निश्चय करत यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.

पैलवानकीचा सराव करत असताना मोहोळ यांनी कोल्हापूर आणि पुणे परिसरात पैलवानांचा मोठा मित्र परिवार तयार केला होता. आज मोहोळ स्वतः लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने पुणे आणि परिसरातील मल्लही मोहोळ यांच्या प्रचारासाठी एकवटले असून पुढील प्रचारासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यात पुढील ४५ दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावरील अंबर हॅाल येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, विविध तालमींचे वस्ताद, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आवर्जून उपस्थित होते.

हेही वाचा..नव्या उमेदवारांनी घेतली आघाडी, प्रचारात विद्यमान मात्र सुस्त, भाजपच्या उमेदवारांची वेगळीच दशा

यामध्ये  पै. दीपक मानकर, पै. बापूसाहेब पठारे, पै. विकास दांगट, पै. आप्पा रेणूसे, पै. शुक्राचार्य वांजळे, पै. बाबा कंधारे, पै. हनुमंत गावडे, पै. योगेश दोडके, पै. संदीप भोंडवे, पै. विलास कथुरे, पै. ज्ञानेश्वर मांगडे, पै. विजय बनकर, पै. शिवराज राक्षे, पै. राजेश बारगुजे, पै. संतोष गरुड, पै. नितीन दांगट, पै. रामभाऊ सासवडे, पै. पंकज हरपुडे, पै. महेश मोहोळ, पै. राजू मोहोळ, पै. तात्या भिंताडे, पै. अभिजीत आंधळकर, पै. विजय जाधव, पै. अमोल बराटे, पै. शिवाजी तांगडे यांच्यासह पुणे आणि परिसरातील पैलवान मोठ्या संख्यने उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी विकी बनकर म्हणाले, आमच्या पैलवानांपैकी एक पैलवान थेट दिल्लीत जाणार आहे. ही आम्हा सर्वांसाठीच मोठी समाधानाची बाब आहे. म्हणून मोहोळ यांच्या विजयात आपलाही वाटा असावा अशी प्रत्येक पैलवानाची भावना आहे. म्हणूनच आम्ही एकवटलो आहोत. आम्ही एकत्रित येत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करत असून यात हजारो पैलवान सहभागी होत आहेत. मोहोळ यांचे मताधिक्य वाढवणे ही आता आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही यसस्वीपणे पार पाडू, हा विश्वास आहे’.

हिंद केसरी पै. योगेश दोडके म्हणाले, ‘मोहोळ यांना मिळालेली उमेदवारी ही आम्हा सर्व पैलवानांचा सन्मान आहे. ते लोकसभेत गेल्यावर आम्हा पैलवानांचे प्रश्न पोटतिडकीने मांडतील आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक पाठपुरावा करतील, हा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही सर्वांनी मोहोळ यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे’.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘लाल मातीशी नाते असणारा माझा परिवार एकवटला असून सर्वजण त्यांच्या पातळीवर प्रचारासाठी सज्ज होत आहेत. येत्या कालावधी ८ ते ९ हजार पैलवान स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे माझा सर्व पैलवान परिवार माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने एकत्र आला आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.

हेही वाचा…भारती पवारांना मोठा धक्का बसणार, पक्षातीलच कार्यकर्ते नाराज, विरोधकांना होणार मोठा फायदा

पै. अप्पा रेणुसे म्हणाले, ‘पुण्यासारख्या शहराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पैलनावाला थेट संसदेत जाण्याची संधी मिळत आहे, हा सर्व पैलवानांचा सन्मान आहे. आपण सर्वांनी पुढील कालावधीत जबाबदारीने घरोघरी प्रचार केल्यास मोहोळ यांना मोठे मताधिक्य मिळेल’.

पै. दिपक मानकर म्हणाले, ‘मोहोळ यांच्या मागे पैलवानांची ताकद उभी राहिल्याने त्यांचे मताधिक्य विक्रमी असेल हा विश्वास आहे. आम्ही सर्वजण विश्वासाने एकत्र आलो असून ही निवडणूक मुरलीधर मोहोळ यांची नाही तर ही निवडणूक दीपक मानकर यांची आहे.’

READ ALSO :

“मला बदनाम करण्याचा प्रयत्न , सगळ्यांची नावे समोर आणणार,” वडेट्टीवारांचा कॉंग्रेसच्याच नेत्यांवर घणाघात

हेही वाचा..एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्याची ठाकरेंची चाल ; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे मशाल पेटवणार ? 

हेही वाचा…उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर ; ठाकरे दुसरा पत्ता काढण्याच्या तयारीत

हेही वाचा…शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

हेही वाचा…आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार

Total
0
Shares
Previous Article
Vadettivar's attack on the leaders of the Congress will bring everyone's names to the fore to defame me

"मला बदनाम करण्याचा प्रयत्न , सगळ्यांची नावे समोर आणणार," वडेट्टीवारांचा कॉंग्रेसच्याच नेत्यांवर घणाघात

Next Article
We are suffering hellish torture here and you are a letter to the foxes from Natak Shirur

"आम्ही इथे नरक यातना भोगतोय", अन् तुम्ही नाटकं..,शिरूरमधून कोल्हेंना पत्र

Related Posts
Total
0
Share