पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर बारामतीत अजित पवारांचं चांगलचं टेन्शन वाढलं. गेल्या काही दिवसापासून विजय शिवतारे सातत्याने अजित पवारांसह शरद पवार यांच्यावर टिका करत निवडणुकीत पाडण्याची भाषा करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात दौरेही सुरू केले होते. अशातच आता विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून अजित पवार आणि विजय शिवतारे हा वाद मिटवला असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मला बदनाम करण्याचा प्रयत्न , सगळ्यांची नावे समोर आणणार,” वडेट्टीवारांचा कॉंग्रेसच्याच नेत्यांवर घणाघात
बारामतीत महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नीन सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. यामतदारसंघातून विजय शिवतारे देखील निवडणुक लढण्यास इच्छूक होते. त्यांनी त्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांची बैठका घेत दौरे देखील सुरू केले होते. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवारांमधील वाद मिटवला असून शिवतारे आणि अजित पवार यांच्यात समेट घडवून आणण्यात यशस्वी ठरले आहे.
हेही वाचा..एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्याची ठाकरेंची चाल ; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे मशाल पेटवणार ?
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत दोघांमधील मतभेदावर चर्चा करून ते दुर झाल्याची माहिती समोर येत आहे. अशातच विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसला ठाकरे गटाकडून डच्चू ; लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट धंगेकरांसाठी करणार नाही काम
हेही वाचा..मोठी बातमी..! उद्धव ठाकरेंनी केली १६ शिलेदारांची यादी जाहीर, निवडणूकीत महायुतीला धोबीपछाड देणार
हेही वाचा…“महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा इशारा
हेही वाचा…“आम्ही इथे नरक यातना भोगतोय”, अन् तुम्ही नाटकं..,शिरूरमधून कोल्हेंना पत्र
हेही वाचा…‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, पुण्यात 1000 मल्ल मोहोळांचा करणार प्रचार