पुणे : विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी संपुर्ण पवार कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहे. अशातच आईसाठी सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे देखील युगेंद्र पवार यांच्यासोबत प्रचारात उतरल्या आहेत. त्यावरून अजित पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकरणकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. त्यावर आता शरद पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्याव पलटवार केलाय.
हेही वाचा…“शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध”, मुरलीधर मोहोळ
रूपालीताई सारखं सारखं कुटुंब म्हणून काय टाहो फोडताहेत ? कुटुंब म्हणणाऱ्यांनीही आपल्याच कुटुंबात उमेदवारी दिलीय ना. आपल्या म्हणण्यानुसार जर फक्त अजितदादांनीच बारामती मतदारसंघात काम केले आहे. तर मग एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती. त्यात तुम्हीही तर इच्छूक होत्याच. असा टोला रोहिणी खडसे यांनी चाकणकरांना लगावला. तसेच जर दादांच्या कामांच्या भरवश्यावर तुम्ही सहज निवडून येऊ शकला असतात पण दादांनी तसे केले नाही. याचे दोन अर्थ निघातात, एकतर तुम्ही त्यांना उमेदवारी योग्य वाटतच नाहीत, किंवा मग दुसरे त्यांनी कामच केलेले नाही म्हणून तर, कुटुंबातीलच सुनेत्राताईंनाच उमेदवारी बहाल केली. काय बरोबर ना रुपालीताई? असंही म्हणत खडसेंनी चाकणकरांवर पलटवार केलाय.
हेही वाचा..“मोहोळांचा विजय काल पुणेकरांनीच दाखवून दिला”, रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
खासदार म्हणून १५ वर्षे काम केल्यानंतर स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर आणि त्याचीही मोठ्या प्रमाणात जाहिरात केल्यानंतर प्रचारासाठी आपल्या वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला प्रचारात उतरविण्याची गरज का भासली,’ अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली. ‘सध्या प्रचारात संपूर्ण कुटुंब उतरले असून, घरात आणखी कोणी राहिले असेल, तर त्यांनाही प्रचारात उतरवाल,’ असा टोलाही त्यांनी लगावला
दरम्यान, सध्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी संपुर्ण पवार कुटुंबीय मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यासह राजेंद्र पवार देखील सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. यासह सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे, युगेंद्र पवार यांच्यासह रोहित पवार आदी संपुर्ण परिवार सुप्रिया सुळेंंच्या प्रचारासाठी बारामतीत मतदारसंघात फिरतांना दिसत आहे. यावरूनच रूपाली चाकणकरांनी सुळेंना टोला लगावला.
@ChakankarSpeaks अहो रुपालीताई, सारखं सारखं कुटुंब कुटुंब म्हणून काय टाहो फोडताहेत?? कुटुंब म्हणणाऱ्यांनीही आपल्याच कुटुंबात उमेदवारी दिलीय ना??? आपल्या म्हणण्यानुसार जर फक्त अजितदादांनीच बारामती मतदारसंघात काम केलेले असेल, तर मग एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती की……
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना इतकं हतबल झालेलं कधीही पाहिलं नाही
हेही वाचा…“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“तटकरेंना दिलेलं प्रत्येक मत मोदींना जाणार”, फडणवीसांचं रायगडमध्ये मोठं विधान