सांगली : गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या सांगली लोकसभेतून कॉंग्रेसचे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगलीची जागा कॉंग्रेसला मिळण्यासाठी अखेरपर्यंत कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी प्रयत्न केलेत. मात्र त्यांच्या प्रयत्नाला अपयश आल्याने महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांना जागा देण्यात आली. मात्र हा वाद आता आणखीच वाढत चालला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सांगलीची जागा लढण्यासाठी इच्छूक असलेले विशाल पाटील यांच्या उमेदवारी अगोदरच ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना ती जागा घोषीत करून टाकली. त्यानंतर संजय राऊत आणि सांगलीचे कॉंग्रेसचे नेते आमनेसामने आलेत. मात्र सांगलीची जागा ही ठाकरेंना गेल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र सांगलीच्या जागेसाठी लढणाऱ्या विश्वजीत कदमांनी कॉंग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर यावरून जोरदार टिका केली. यातच विश्वजीत कदमांनी महाविकास आघाडीतील एका नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यातच आता जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी केला आहे.
विलास जगताप म्हणाले की, एकेकाळचे वसंतदादा पाटील यांच्या खिशात सगळ्यांची तिकीटं होती. परंतु त्यांच्याच नातवाला आज तिकीटासाठी मुंबई, दिल्ली नागपुर अशी हेलपाटे घालावी लागतात. ही अतिशय दुखत घटना आहे. या सगळ्या खेळी संजय राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी केल्या आहेत. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वसंतदादांचं घराणं संपवण्याचा घाट या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतलं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. असेही ते म्हणाले.
दरम्यान, आमच्या जिल्ह्याला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. ती दृष्ट कशी दुर करायची हे आम्हाला माहितीय असं म्हणत विश्वजीत कदमांनी जयंत पाटील यांच्यावर अपक्ष निशाणा साधला होता. त्यावरून आता सांगलीत महाविकास आघाडीत जयंत पाटील यांच्या विरोधात कॉंग्रेसचे स्थानिक नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तटकरेंना दिलेलं प्रत्येक मत मोदींना जाणार”, फडणवीसांचं रायगडमध्ये मोठं विधान
हेही वाचा…“शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध”, मुरलीधर मोहोळ
हेही वाचा..“मोहोळांचा विजय काल पुणेकरांनीच दाखवून दिला”, रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
हेही वाचा…नगरमध्ये लंकेंच्या विरोधात डमी उमेदवार रिंगणात, निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार घणाघात