IMPIMP

“महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा इशारा

Prakash Ambedkar gave a big warning if the Mahavikas Aghadi's quarrel is not resolved

मुंबई : आजही महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू असून तिढा कायम आहे. त्यांचा तिढा सुटला की नाही? याबाबत आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा तिढा मिटणार नसेल तर आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन तरी काय उपयोग? आम्ही फक्त २६ मार्चपर्यंत थांबणार आहोत. २६ तारखेला वंचित बहुजन आघाडीची जी काही भूमिका असेल ती आम्ही स्पष्ट करणार आहोत. असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत वंचित लोकसभेच्या निवडणुका लढणार का ? त्याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा…शिवतारेंनी अजित पवारांना खिंडित गाठलं, शिंदे शिवतारेंवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवीन पक्ष काढला असून एक यादी आमच्याकडे दिली आहे. त्यांना आम्ही सांगितले की, आमचे महाविकास आघाडीबरोबर भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आता काही सांगू शकत नाहीत. प्रकाश शेंडगे आणि आमच्यामध्ये दीड तास चर्चा झाली. त्यामध्ये ते कोणते मतदारसंघ मागतात, हे आम्ही ऐकूण घेतले. महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर आम्ही त्यांच्यामध्ये कुठे शिरायचे? असा सवालही त्यांनी केला आहे.

हेही वाचा…आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश ठरला ; प्रचाराचा नाराळ या दिवशी फोडणार

दरम्यान, मागील काही दिवसापासून वंचित आणि महाविकास आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहेत. जागावाटपावरून अद्यापही वंचितने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केलेला नाहीय. कॉंग्रेसने आपल्या सात उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र इतर उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.त्यामुळे वंचितच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

READ ALSO :

हेही वाचा…“आम्ही इथे नरक यातना भोगतोय”, अन् तुम्ही नाटकं..,शिरूरमधून कोल्हेंना पत्र 

हेही वाचा…‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, पुण्यात 1000 मल्ल मोहोळांचा करणार प्रचार

हेही वाचा…“मला बदनाम करण्याचा प्रयत्न , सगळ्यांची नावे समोर आणणार,” वडेट्टीवारांचा कॉंग्रेसच्याच नेत्यांवर घणाघात

हेही वाचा..एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्याची ठाकरेंची चाल ; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे मशाल पेटवणार ? 

हेही वाचा…उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर ; ठाकरे दुसरा पत्ता काढण्याच्या तयारीत

Total
0
Shares
Previous Article
We are suffering hellish torture here and you are a letter to the foxes from Natak Shirur

"आम्ही इथे नरक यातना भोगतोय", अन् तुम्ही नाटकं..,शिरूरमधून कोल्हेंना पत्र

Next Article
the-foxes-played-the-first-innings-to-avenge-the-2019-loss-to-patrao-patal

"आढळराव पाटलांना २०१९ चा बदला घ्यायचाय," कोल्हेंनी पहिला डाव टाकला

Related Posts
Total
0
Share