मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे गट लोकसभेच्या २२ जागांवर आग्रही आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काही नव्या तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांना पुन्हा नव्याने संधी दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
1 बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
2. यवतमाळ- संजय देशमुख
3. मावळ – संजोग वाघेरे- पाटील
4. सांगली -चंद्रहार पाटील
5. हिंगोली- नागेश अष्टीकर
6. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
7. धाराशीव- ओमराजे निंबाळकर
8. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
9. नाशिक- राजाभाऊ वाझे
10. रायगड – अनंत गिते
11. रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
12. ठाणे- राजन विचारे
13. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
14. मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
15. मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
16. मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
17. परभणी- संजय जाधव
दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन सध्या महाविकास आघाडीत नाराजी सुरु आहे. कारण उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. मात्र, सांगलीची जागा काँग्रेसचं लढवणार असल्याचा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतलाय. याच मुद्यावरुन आज काँग्रसचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. सांगलीची जागा कॉंग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे.