पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अशा गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत सामील होऊ पाहणाऱ्या वंचिने आपले ७ उमेदवार घोषीत केल्यानंतर आघाडीसमोर मोठा पेच निर्माण झालाय. अशातच मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून दंबग युवा नेते संदीप वाघेरे आणि मंगलदास बांदल वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजुला मनसेतून राजीनामा दिलेले फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे देखील वंचितचा पर्याय अवंलबणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसला ठाकरे गटाकडून डच्चू ; लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट धंगेकरांसाठी करणार नाही काम
मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवकर संदीप वाघेरे यांनी जोरदार तयारी केली होती. पुणे-मुंबई महामार्गासह संपुर्ण मतदार संघात होर्डिंग, बॅनरद्वारे वातावरण निर्मिती केली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ठाकरेंनी माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यावर विश्वास दाखवल्याने संदीप वाघेरे यांना निवडणुकीतून माघार किंवा वंचित च्या तिकीटावर लढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीय.
चिंचवड पोटनिवडणुकीत माजी नगरसेवक राहुल कलाट यांना वंचितने पाठिंबा दिला होती. त्यावेळी कलाटे यांना ४४ हजारहून अधिक मते पडली होती. मावळ मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांना ७५ हजार पेक्षा अधिक मते पडली होती. त्यामुळे वंचितने उमेदवार दिला तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..मोठी बातमी..! उद्धव ठाकरेंनी केली १६ शिलेदारांची यादी जाहीर, निवडणूकीत महायुतीला धोबीपछाड देणार
दुसऱ्या बाजूला काहीही झालं तरी निवडणुक लढवणारच असा दावा सांगणारे पुणे जिल्हा बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. बांदल यांनी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे बांदल यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केलाय. ही निवडणुक बांदल जिंकण्यापेक्षा कोल्हे यांना हरवण्यासाठी लढतील असे निरीक्षण राजकीय जाणकरांनी नोंदविले आहे.
दरम्यान, मनसेतून राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीची चाचपणी करणारे वंसत मोरे यांना आता वंचितचा पर्याय शिल्लक राहिला आहे. लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले मोरे कॉंग्रेससह शरद पवार आणि ठाकरे गटाकडेही तिकीटासाठी गेले. मात्र पुणे लोकसभेसाठी कॉंग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने मोरे यांना आता वंचितचा पर्याय दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार,” कॉंग्रेसच्या विशाल पाटलांनी दिला इशारा, सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी
हेही वाचा..नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाजलं, भुजबळांना उमेदवारी दिल्यास मोठ्या बंडाची शक्यता
हेही वाचा…तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौजच वर्षावर दाखल, खासदारांची भीती दूर करण्यासाठी मध्यरात्री खलबतं
हेही वाचा…भारती पवारांना आपल्याच मतदारसंघात बसणार मोठा फटका ; भाजपसह मित्र पक्षातील नेत्यांची प्रचंड नाराजी
हेही वाचा…महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा ! विजय शिवतारे – अजित पवारांमधील वाद फडणवीसांनी मिटवला…