सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी १७ उमेदवारांची घोषणा केली आहे. यावरून कॉंग्रेससह शरद पवार गटाने देखील नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. सांगलीतून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी घोषीक केल्यानंतर कॉंग्रेसकडून इच्छूक असलेल्या विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त करत निवडणुक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत निवडणुकीपुर्वीच बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..मोठी बातमी..! उद्धव ठाकरेंनी केली १६ शिलेदारांची यादी जाहीर, निवडणूकीत महायुतीला धोबीपछाड देणार
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील गेली दोन वर्ष लोकसभेसाठी प्रयत्नशील आहेत. कॉंग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेसाठी जोमाने तयारी करत असताना अचानकपणे ठाकरे गटाने १५ दिवसांपुर्वी पक्ष प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने स्वांतत्र्यपासून कॉंग्रेसच्या मुशीत घडलेले दादा घराणे राजकीय विजनवासात जाते की काय ? अशी स्थिती निर्माण झालीय.
यावर बोलतांना विशाल पाटील म्हणाले की, ही पहिली सार्वत्रित निवडणूक आहे. ज्यात शिवसेना आघाडीत आहे. पुर्वीपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची जागावाटपाची एक पद्धत होती. कुणी कुठली जागा लढवायची हे एकमेकांना माहीत होतं. शिवसेनेने कुठलीही चर्चा केली नाही. कॉंग्रेस हा महाविकास आघाडीतला जबाबदार पक्ष आहे. त्यामुळे चर्चा केल्याशिवाय आम्ही नावं जाहीर करणार नाही. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात जो निर्णय होईल. त्याची अंमलबजावणी केली जाईल असे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा इशारा
यातच पक्षाने आदेश दिला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, मैत्रीपुर्ण लढत असो किवा शत्रुत्वाची लढाई असो काहीही झालं तरी निवडणूक लढणारच असा निर्धारही त्यांनी केलाय.
दरम्यान, आम्ही आज मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली आहे. सांगली हा कॉंग्रेसचा पारंपारीक मतदारसंघ राहिला आहे. मित्र पक्षांना ही जागा कॉंग्रेससाठी सोडण्यासाठी सांगितलं होतं. आता पुन्हा तीच विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. कोल्हापुरच्या जागेवर शाहू महाराज निर्णय घेतील. त्या पक्षाकडे जागा जाईल. असंही ठरलं होतं. मात्र शिवसेनेने जागा जाहीर केली असल्याचे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाजलं, भुजबळांना उमेदवारी दिल्यास मोठ्या बंडाची शक्यता
हेही वाचा…तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौजच वर्षावर दाखल, खासदारांची भीती दूर करण्यासाठी मध्यरात्री खलबतं
हेही वाचा…भारती पवारांना आपल्याच मतदारसंघात बसणार मोठा फटका ; भाजपसह मित्र पक्षातील नेत्यांची प्रचंड नाराजी
हेही वाचा…महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा ! विजय शिवतारे – अजित पवारांमधील वाद फडणवीसांनी मिटवला…
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसला ठाकरे गटाकडून डच्चू ; लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट धंगेकरांसाठी करणार नाही काम