बुलढाणा : महायुतीत भाजपने आपल्या काही उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेने अद्याप कोणत्याही उमेदवारांची घोषणा केली नाही. असे असतांना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर केल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार प्रतापराव जाधव असून आणि याठिकाणी पक्षाकडून कुणालाही उमेदवारी जाहीर न करताच संजय गायकवाड यांनी अर्ज सादर केल्याने महायुतीत बंडाची पहिली ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे .
हेही वाचा…महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा ! विजय शिवतारे – अजित पवारांमधील वाद फडणवीसांनी मिटवला…
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव म्हणून संभाव्य उमेदवार आहेत. मात्र आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक पक्षाकडून तर एक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असल्याची माहिती समोर येत आहे. यातच बारामतीत अजित पवारांच्या विरोधात शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी थंड थोपटले होते. यातच काल मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवतारेंचं बंड थंड केलं. तर दुसऱ्या बाजूला बुलढाण्यात आता संजय गायकवाड यांनी बंड फुकारल्याने याची एकच चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसला ठाकरे गटाकडून डच्चू ; लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट धंगेकरांसाठी करणार नाही काम
दरम्यान., शिंदे गटाचे काही मतदारसंघ भाजपने खेचल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजीचा सुर उमटतांना दिसत आहे. निगेटिव्ह सर्व्हेंचं कारण पुढं करत जागा घेतल्याची तक्रार शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.शिंदे गटाकडे असलेले मतदारसंघात आपल्याकडे घेत असल्याची तक्रार केली जात आहे. तसेच काही नेत्यांचे खच्चिकरण केलं जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“दबंग युवा नेते वाघेरे, बांदल अन् मोरे ‘वंचित’ मधून लढणार?”, लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढती अटळ
हेही वाचा…“तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार,” कॉंग्रेसच्या विशाल पाटलांनी दिला इशारा, सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी
हेही वाचा..नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाजलं, भुजबळांना उमेदवारी दिल्यास मोठ्या बंडाची शक्यता
हेही वाचा…तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौजच वर्षावर दाखल, खासदारांची भीती दूर करण्यासाठी मध्यरात्री खलबतं
हेही वाचा…भारती पवारांना आपल्याच मतदारसंघात बसणार मोठा फटका ; भाजपसह मित्र पक्षातील नेत्यांची प्रचंड नाराजी