पुणे : मागील काही महिन्यांपासून मावळात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको, अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आता युटर्न घेण्याची तयारी दर्शविली आहे. अजित पवारांनी मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा असे आदेश दिल्यानतंर बारणेच महायुतीचे उमेदवार असतील असे संकेत दिलेत. आता अजित दादा जे आदेश देतील, त्यांचं पालन आम्ही करू. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेऊ, असे म्हणत शेळकेंनी युटर्न घेण्याची तयारी दर्शविली आहे.
हेही वाचा…भारती पवारांना आपल्याच मतदारसंघात बसणार मोठा फटका ; भाजपसह मित्र पक्षातील नेत्यांची प्रचंड नाराजी
श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील विरोध केला होता. मावळची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी आग्रहाची भूमिका शेळके यांनी घेतली होती. मात्र आंबेगावच्या सभेत अजितदादांनी मावळात धनुष्यबाण चालवा असे आदेश दिल्याने शेळकेंनी मवाळ भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता मावळमधून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
हेही वाचा…महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा ! विजय शिवतारे – अजित पवारांमधील वाद फडणवीसांनी मिटवला…
दरम्यान, सुनील शेळके म्हणाले की, आमचे सर्वेसर्वा अजित पवार असून त्यांनी जी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेसोबत आम्ही ठामपणाने उभे राहणार आहोत. मात्र महायुतीचा धर्म फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाळावा, असे नाही आहे. शिवसेना, भाजप यांनी देखील युतीचा धर्म पाळला पाहिजे. हा धर्म पाळत असतांना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केलं पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी मी अजूनही प्रयत्न करत आहे. या जागेवर अजूनही दावा सांगत आहे. मात्र जो उमेदवार असेल त्याच्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे बारणे यांचं टेन्शन काही प्रमाणात कमी झालं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महायुतीत बंडाची पहिली ठिणगी” शिवतारेंचं बंड थंड, आता बुलढाण्यात शिंदे गटातून बंड ?
हेही वाचा…“दबंग युवा नेते वाघेरे, बांदल अन् मोरे ‘वंचित’ मधून लढणार?”, लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढती अटळ
हेही वाचा…“तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार,” कॉंग्रेसच्या विशाल पाटलांनी दिला इशारा, सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी
हेही वाचा..नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाजलं, भुजबळांना उमेदवारी दिल्यास मोठ्या बंडाची शक्यता
हेही वाचा…तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौजच वर्षावर दाखल, खासदारांची भीती दूर करण्यासाठी मध्यरात्री खलबतं