कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आठ उमेदवारांची लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा केली आहे. यामध्ये हातगणंकले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना पुन्हा शिंदेंनी संधी दिली आहे. मात्र धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे. यातच माने यांनी कॉंग्रेसच्या सतेज पाटील यांचं कौतूक केल्याने भाजपने माने यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ती नाराजी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येऊ लागली आहे.
हेही वाचा…“मला कोणाचाही पराभव करण्यासाठी लढायचं नाही”, सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात
सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत लोकसभेची अटीतटीची लढत होत आहे. प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात विजयासाठी मोठी तयारी करतांना दिसत आहे. अशातच हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सतेज पाटील यांचं भरभरून कौतूक केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“राऊतांनी तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं”, आंबेडकरांचा मोठा आरोप
धैर्यशील माने यांच्याविरोधात काही सोशल मीडियावर मॅसेज फिरत असून त्यातून कडक इशारा देण्यात आलाय. यामध्ये काही दिवसांपुर्वी तुम्ही एक स्टेटमेंट दिलेलं. जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटलांना दुखवून चालत नाही. असे म्हणाले होते. हे आजही आम्ही कोणीही विसरलेलो नाही. आज भाजपची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर तर हे इथून पुढे चालणार नाही. असे असेल तर मतं मागायला आमच्या दरात या. असे मॅसेज मध्ये उल्लेख करण्यात आलाय.
दरम्यान, शिवसेना बंडाच्या वेळी सोबत आलेल्या खासदारांनाच शिंदे यांनी आपली पहिली पंसती दिल्याचे जाहीर केलेल्या यादीवरून स्पष्ट झाले आहे . यामध्ये मावळातून श्रीरंग बारणे, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर रामटेकमधून राजू पारवे यांना संधी देण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर ; 7 जणांना पुन्हा संधी, तर एका जागेवर कॉंग्रेसच्या नेत्याला लॉटरी
हेही वाचा…मावळात बारणे विरूद्ध वाघेरे यांच्यात लढत ; बारणे विजयाची हॅट्रिक साधणार का ?
हेही वाचा…नवनीत राणा कमळावर निवडणूक लढवणार ; अडसूळ आणि बच्चु कडू महायुतीचा धर्म पाळणार का ?
हेही वाचा..अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार, म्हणाले…