सातारा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी नकार दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सातारा येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरून येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…“भाजपची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर..,” शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा कडक इशारा
श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुक लढण्यास नकार दिल्याने अनेक जण यासाठी इच्छूक आहेत. यामध्ये शरद पवारांनी इच्छूक उमेदवारांचीही नावे जाहीर केली आहेत. यामध्ये बाळासाहेब पाटील, सुनील माने, शशिकांत शिंदे तर स्वत: शरद पवार यांचं नाव देखील कार्यकर्त्यांनी सुचवलं असल्याचे शरद पवारांनी सांगितले. यासह श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर सारंग पाटलांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर ; 7 जणांना पुन्हा संधी, तर एका जागेवर कॉंग्रेसच्या नेत्याला लॉटरी
दरम्यान, यावेळी शरद पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर साताऱ्याच्या जनतेचं राष्ट्रवादीवर खुपच प्रेम राहिलं आहे. श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यातून लढण्यास नकार दिला आहे. पक्षासाठी सर्व काम करेन असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांची मतं मी इथे येऊन जाणून घेतली. याचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर करेन अशीही भूमिका शरद पवारांनी मांडली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी ; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“तुर्तास तरी माघार नाही”, शिंदेंच्याच आमदाराने महायुतीच्या विरोधात ठोकला शड्डू
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे पुत्रही वेटिंगवर, महायुतीत ‘या’ जागांवर असूनही सस्पेन्स कायम !
हेही वाचा…निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा ; ? विखेंच्या विरोधात लोकसभा लढवणार
हेही वाचा…“एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले”, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचं निधन