पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लक्षद्वीप मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात येथील मतदान होत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बुधवारी उशिरा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, संबंधित उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही, असा दावा शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. परंतु त्यावर आता अजित पवार गटाकडून खंडन करण्यात आलंय.
हेही वाचा…“तुर्तास तरी माघार नाही”, शिंदेंच्याच आमदाराने महायुतीच्या विरोधात ठोकला शड्डू
लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना घड्याळ हेच चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नयेत, अशी विनंती अजित पवार गटाचे ठाणे जिल्ह्याध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलीय. टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करायचा असतो असे शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते बोलतात, पण खोडसाळपणे चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यावर इनकरेक्ट कार्यक्रमच होतो, हे ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावे असा टोलाही पराजंपे यांनी लगावला.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे पुत्रही वेटिंगवर, महायुतीत ‘या’ जागांवर असूनही सस्पेन्स कायम !
दरम्यान, लक्षद्वीपमधून अजित पवार यांच्याकडून युसूफ. टी.पी. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार मोहम्मद फैजल यांचे आव्हान आहे.१९ एप्रिल रोजी येथे पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान, येथे भाजपकडून अजित पवार यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय .
READ ALSO :
हेही वाचा…प्रबळ उमेदवाराच्या शोधात अजूनही कॉंग्रेस घुटमळली ; धुळ्यात कॉंग्रेसला उमेदवार सापडेना
हेही वाचा…“वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा लढणार ? मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट”
हेही वाचा…राम सातपुते यांच्या पाठीमागे महायुतीची मोठी ताकद ; सोलापुर लोकसभेत कॉंग्रेसचा पराभव अटळ
हेही वाचा…साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटलांचा नकार, शरद पवारांनी इच्छूक उमेदवारांची केली नावं जाहीर
हेही वाचा…मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी ; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल