पुणे : पुणे लोकसभेची निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या वसंत मोरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली आहे. या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती वसंत मोरे यांनी पत्रकारांना दिली आहे. तसेच यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा ; ? विखेंच्या विरोधात लोकसभा लढवणार
मी शंभर टक्के पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आहे, मी माझं नशीब समजतो की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मला इथं बोलावलं आहे. मला त्यांनी पुरेसा वेळ दिला. त्यातून आमची अतिशय चांगली चर्चा झाली. पुण्यातील मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे आमच्याकडे खूप वेळ आहे, पुढील काही दिवसांत कोणता मार्ग स्वीकारायचा याबाबत निर्णय घेऊ. पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार द्यायचा की नाही, याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील, असेही वसंत मोरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले”, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचं निधन
दरम्यान, पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर पहिल्यापासून निवडणुक लढविण्यास इच्छूक असलेल्या वसंत मोरे यांनी वंचितकडून लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. असे झाल्यास पुणे लोकसभेची निवडणुक ही तिरंगी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राम सातपुते यांच्या पाठीमागे महायुतीची मोठी ताकद ; सोलापुर लोकसभेत कॉंग्रेसचा पराभव अटळ
हेही वाचा…साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटलांचा नकार, शरद पवारांनी इच्छूक उमेदवारांची केली नावं जाहीर
हेही वाचा…मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी ; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“तुर्तास तरी माघार नाही”, शिंदेंच्याच आमदाराने महायुतीच्या विरोधात ठोकला शड्डू
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे पुत्रही वेटिंगवर, महायुतीत ‘या’ जागांवर असूनही सस्पेन्स कायम !