नाशिक : महायुतीकडून दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. भारती पवार यांना भाजपने दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार घोषीत करण्यात आलेला नाहीय. अशातच अजित पवार गटात असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे सुपूत्र गोकुळ झिरवळ यांनी निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यांनी शरद पवार यांना भेटून निवेदन देखील दिले आहे. त्यामुळे नाशकात सध्या याची एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…प्रबळ उमेदवाराच्या शोधात अजूनही कॉंग्रेस घुटमळली ; धुळ्यात कॉंग्रेसला उमेदवार सापडेना
भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी इच्छूक होते. मात्र ऐनवेळी भाजपने भारती पवारांना संधी दिली आणि त्याठिकाणी त्या खासदार झाल्यात. २००९ पासून दिंडोरी मतदारसंघात भाजपचीच सत्ता राहिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने भाजपला राष्ट्रवादी जोरदार टक्कर देतांना दिसत आहे. यातच काल नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त करत तसे निवेदन देखील दिले आहे. त्यामुळे झिरवळ यांची भुमिका काय ? याबाबत संभ्रम निर्माण झालाय.
हेही वाचा…“वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा लढणार ? मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट”
शरद पवार गटाकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे निवडणुक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्याचबरोबर भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी देखील मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतली होती. यातच आता झिरवळ यांनी देखील निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे विद्यमान खासदार भारती पवार यांच्या विरोधात शरद पवार कोणता उमेदवार देणार ? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात पक्ष फुट पडल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पित्रा-पुत्रामध्ये किंवा कुटुंबातच लढत होतांना दिसत आहे. मुंबईत खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांचेच सुपुत्र अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. बारामतीतही भावजय-विरूद्ध नणंद असा सामाना निश्चित मानला जात आहे. अशातच आता पुन्हा दिंडोरीत पुत्राने पित्याच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे याची राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुरलीधर मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढतेय ; प्रचारात घेतली जोरदार आघाडी
हेही वाचा…“राजकारणात बच्चू कडूचा कुणी बाप नाही”, बच्चू कडूंचा राणांच्या विरोधात लढण्याचा निर्णय पक्का
हेही वाचा…“तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी ;” राम सातपुते यांचा प्रणिती शिंदेंवर घणाघात
हेही वाचा…“..अन्यथा पुण्यात लोकसभेचं काम करणार नाही,” पुण्यात ठाकरे गट आक्रमक, धंगेकरांच्या अडचणीत वाढ
हेही वाचा…लक्षद्वीपमध्येही घड्याळ चिन्ह वापरता येणार ; राष्ट्रवादीचे दोन्ही गट लक्षद्वीपमध्ये आमनेसामने