अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभेची पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसऱ्या बाजुला मित्र पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली आहे. यातच बच्चू कडू नावाचं वादळ आमच्या सागर बंगल्यावर शमवल जाईल, असा टोला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. त्यावर राजकारणात बच्चू कडूचा कुणी बाप नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी नितेश राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…राम सातपुते यांच्या पाठीमागे महायुतीची मोठी ताकद ; सोलापुर लोकसभेत कॉंग्रेसचा पराभव अटळ
सध्या महायुतीत नाराज असलेले अनेक नेते सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. काही मतदारसंघात महायुतीत होणारी बंडाळी मोडण्यास देवेंद्र फडणवीस यांना यश येत आहेत. तर अजूनही काही महायुतीच्या उमेदवाराबाबत नेते नाराज आहेत. यातच राणांच्या विरोधात बच्चू कडू यांनी निवडणुक लढविण्याचे निश्चित केले आहे.
हेही वाचा…साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटलांचा नकार, शरद पवारांनी इच्छूक उमेदवारांची केली नावं जाहीर
नितेश राणेंच्या टिकेला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, ब्रह्यदेव जरी खाली आला तरी आम्ही अमरावतीतून माघार घेणार नाही. आमचा स्वाभिमान आहे. आम्ही बुडालो तरी चालणार, पण स्वाभिमान जाता कामा नये. गुलामीत राहण्याची सवय आम्हाला नाही. हर मर जाएंगे, कर जायेंगे.लेकीन ताकद से लढेंगे, असे बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितले आहे. तर आमचा नेता दिल्ली-मुंबईतल बसलेला नाही. राजकारणात बच्चू कडूचा कुणी बाप नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी ;” राम सातपुते यांचा प्रणिती शिंदेंवर घणाघात
हेही वाचा…“..अन्यथा पुण्यात लोकसभेचं काम करणार नाही,” पुण्यात ठाकरे गट आक्रमक, धंगेकरांच्या अडचणीत वाढ
हेही वाचा…लक्षद्वीपमध्येही घड्याळ चिन्ह वापरता येणार ; राष्ट्रवादीचे दोन्ही गट लक्षद्वीपमध्ये आमनेसामने
हेही वाचा…प्रबळ उमेदवाराच्या शोधात अजूनही कॉंग्रेस घुटमळली ; धुळ्यात कॉंग्रेसला उमेदवार सापडेना
हेही वाचा…“वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा लढणार ? मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट”