छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर या उमेदवारीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. यातच अंबादास दानवे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशीचीही चर्चा सुरू झाली. त्यावर आज अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन मी सच्चा शिवसैनिक असून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा…मुरलीधर मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढतेय ; प्रचारात घेतली जोरदार आघाडी
अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी काम करणारा शिवसैनिक आहे. मला पक्षातून बाहेर पडायचं असतं तर मागेच बाहेर पडलो असतो. माझ्या पक्ष प्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत. मी नाराज असलो म्हणून काय झालं, मी तीस वर्षापासून शिवसेनेचे काम करत आहे. शिवसेनेचे आणि भाजपचे विचार सारखे होते आम्ही त्यांच्याकडे गेलो का ? आम्ही शिवसेनेतच राहिलो. आता मी प्रचारात उतरणार आहे. मागच्या आठवड्यात १०० गावांचा दौरा केला आहे, मी शिवसेनेचाच प्रचार करणार आहे. माझ नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“राजकारणात बच्चू कडूचा कुणी बाप नाही”, बच्चू कडूंचा राणांच्या विरोधात लढण्याचा निर्णय पक्का
यातच तुम्हाला भाजपकडून ऑफर आली आहे. आज सकाळी पक्ष प्रवेश करणार आहे का ? त्यावर ते म्हणाले की, ज्या माध्यमांनी माझा पक्ष प्रवेश १० वाजता होणार होता, हे सांगितलं होतं ते खोटं ठरवलं आहे. मी कोणताही पक्ष प्रवेश करणार नाही. माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नाही. पद येत असतात. पद जात असतात. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. अशा खोट्या बातम्या भाजप पसरवत आहे. असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाही. त्यांनी आणि मीही तिकीट मागितले होते. खैरे साहेब आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. मला महायुतीकडून कोणतीही ऑफर आली नाही. महायुतीकडे आमच्याविरोधात लढायला उमेदवार सापडलेला नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्यातील नाराजी संपली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ नेता वर्ध्यातून तुतारीवर लोकसभा लढणार ; आघाडीत वर्ध्याचा जागेचा तिढा संपुष्टात
हेही वाचा…लातूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांची सुन भाजपात दाखल
हेही वाचा…‘त्या’ तीन जागांसाठी शिंदेंना हवा १६ आकडा, नाहीतर अनेक मतदारसंघ त्यागाची वेळ येणार
हेही वाचा…शरद पवार गटातील उमेदवारांची नावे जाहीर होणार ; शरद पवारांचे ‘दहा’ शिलेदार लोकसभेसाठी तयार
हेही वाचा…नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांनी भारती पवारांच्या विरोधात ठोकला शड्डू ; दिंडोरी लोकसभेत मोठा ट्विस्ट !