नाशिक : महायुतीत काही जागांचा तिढा सुटला असला तरी नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि अजित पवार गटात चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. यातच आता अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांच्या नव्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकची जागा कुणाच्या पारड्यात जाणार ? यााची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिलीय.
हेही वाचा…लातूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांची सुन भाजपात दाखल
उमेदवारीसाठी मी मागणी केली नव्हती, परंतु दिल्लीच्या बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली आहे. असा दावा छगन भुजबळांनी केलाय. त्यावर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची नाशिकची जागा आम्ही सोडणार नाही. असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय. आता कुणाची उमेदवारी दिल्लीहून आली असे म्हणतात, याबद्दल आम्हाला कल्पना नाही. पण अशाप्रकारे कुणाला दिल्लीहून उमेदवारी मिळाली म्हणून उभे राहायचं सांगितले असेल तर ते समोर येईलच. पण ती जागा आम्ही सोडणार नाही हे मात्र निश्चित झालं आहे. असे शिरसाठ म्हणाले.
हेही वाचा…‘त्या’ तीन जागांसाठी शिंदेंना हवा १६ आकडा, नाहीतर अनेक मतदारसंघ त्यागाची वेळ येणार
दरम्यान, दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांना कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. असा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. त्यासंदर्भात पोस्टर देखील गावोगावी लावले जात आहेत. मराठा आरक्षण विरोधक छगन भुजबळांना मराठा समाज निवडणुकीत मत देणार नाही. असा पोस्टरवर उल्लेख करण्यात आला आहे. तर काही गावांमध्ये अशा प्रकारे ठरावही मांडण्यात आले आहे. त्यामुळे भुजबळांना महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिवतारे जर असा युटर्न घेत असतील तर लोक त्यांना..”बारामतीतून माघार घेतल्याने शिवतारेंना पवारांनी डिवचलं
हेही वाचा…ना मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, ना फडणवीसांचं ; ‘तो’ एक फोन आला अन् शिवतारेंनी बारामतीतून घेतली माघार
हेही वाचा…चंद्रपूरच्या जागेचा तिढा सुटला; प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार ; मात्र वडेट्टीवार समर्थक भाजपात दाखल
हेही वाचा…”मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक ;” भाजप प्रवेशावर अंबादास दानवेंचा पुर्णविराम
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ नेता वर्ध्यातून तुतारीवर लोकसभा लढणार ; आघाडीत वर्ध्याचा जागेचा तिढा संपुष्टात