सोलापुर : महाविकास आघाडीकडून सोलापुर लोकसभेतून कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक लढणाऱ्या महायुतीचे उमेदवार भाजप आमदार राम सातपुते यांच्याशी होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी सोलापुर मतदारसंघात आपला प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. मात्र पंढरपुरात झालेल्या घटनेनंतर प्रणिती शिंदे यांच्याविरोधात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
हेही वाचा…नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाद वाढला, भुजबळांच्या दाव्याने खळबळ, दुसऱ्या बाजूला मराठा समाजही आक्रमक
मागच्या काही निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांना कौठळी गावातून दोन वेळा लीड मिळालं आहे. परंतु शिंदे घराण्याने आमच्या गावाकडे गेली दहा वर्षे मागे फिरून पाहिलेलं नाहीय. ते दहा वर्षात एकदा तरी आमच्या गावात आले नाही. निवडून आल्यानंतर एकही काम केलं नाही. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही मतदान करतांना विचार करू, अशी प्रतिक्रिया कौठळी गावातील एका मतदारांनी दिली.
हेही वाचा…“शिवतारे जर असा युटर्न घेत असतील तर लोक त्यांना..”बारामतीतून माघार घेतल्याने शिवतारेंना पवारांनी डिवचलं
सुशील कुमार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद तसेच केंद्रात अनेक कॅबिनेट मंत्री पद उपभोगली आहेत. मात्र त्यांना आपल्याच मतदारसंघात कोणतेही काम करता न आल्याची भावना देखील सोलापुरकरांनी व्यक्त करून दाखवली आहे. यातच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सुशील कुमार शिंदे यांच्या कामाचा तपशील मागितला. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी सुशील कुमार शिंदे यांचं नाव न घेण्याची मागणी केली. त्यावरून शिंदे कुटुंबियांना सोलापुरकर वैतागले असल्याची भावना मतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र तुमचे वडिल इतक्या दिवसात राजकारणात होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद , केंद्रात कॅबिनेट मंत्री होते. इतके वर्ष असूनही तुम्ही आतापर्यंत काय काम केली आहेत ? असा सवाल प्रणिती शिंदे यांना गावकऱ्यांकडून केला जात आहे. यातच गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यामध्ये मोठा विकास केला आहे. महाराष्ट्रात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकल्प साकार झाल्याचे दिसून येत आहे. तसेच तुम्ही फक्त विकासावर बोला. असा सुर देखील काही गावांमधून दिसायला लागला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोहोळांना विजयी करण्यासाठी सर्व आघाड्या लागल्या कामाला ; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका सुरू
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांचा मुलगा लोकसभेत पाठवा ; समाधान दादा आवताडे यांचं जनतेला आवाहन
हेही वाचा…शरद पवार गटाचे पाच उमेदवार जाहीर ; लंके, सुप्रिया सुळे कोल्हेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर
हेही वाचा…पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील अन् आढळराव यांच्यात दिलजमाई ; कोल्हेंपुढे मोठी अडचण
हेही वाचा…सोलापुरात राम सातपुते सेफ झोनमध्ये तर प्रणिती शिंदेंना बसणार मोठा फटका ; मराठा समाजाचा मोठा निर्णय