हिंगोली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यातच हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले असून एका कार्यक्रमात थेट हेमंत पाटील यांच्याविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी दिली आहे. त्यामुळे महायुतीत हेमंत पाटील यांची जागा आता धोक्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न यावेळी अजित पवार पुर्ण करणार का ?” महाराष्ट्रातील यंदाची सर्वात लक्षवेधक लढत
हिंगोली लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपकडून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी किनवटचे आमदार भिमराव केराम, हिंगोलीविधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने असे दिग्गज नेते बैठकीसाठी उपस्थित होते. असे दिग्गज नेते उपस्थित असतांना उमेदवार हेमंत पाटील यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी यावेळी भाजपा अंगार है, बाकी सब भंगार है, अशी घोषणाबाजीही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
हेही वाचा…शिंदे कुटुंबीयांना आम्ही वैतागलोय, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात मोठा रोष
यातच या बैठकीसाठी रामदास पाटील आल्यानंतर रामदास पाटील आगे बढोच्या घोषणा देण्यात आल्या. तर यावेळी हिंगोलीतील उमेदवार बदलण्याच्या मागणीलाही जोर येऊ लागला आहे. यातच आता नाराज झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज सांयकाळी बोलवण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार ? हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यात येणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आधी प्रचार करणार नाही म्हणाले, अन् आज थेट पेढे घेऊन दानवे खैरेंच्या घरी,” एकच चर्चा
हेही वाचा…“पवार घराण्याने नेहमी झोडा आणि तोडा भूमिका घेतलीय”, पण आता..,” यशवंत ब्रिगेडने बारामतीत दोन्ही पवारांना दिलं आव्हान
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय
हेही वाचा…“रोहित पवारांनी आता फक्त स्वत:ची आमदारकी सांभाळावी”, भाजपचा रोहित पवार उपरोधिक टोला
हेही वाचा…“कामगारांचा मुलगा अन् विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी”, लढाई जिंकणार कशी ? राम सातपुते यांनी सांगितली रणनिती