पुणे : बारामतीत शिंदे गटाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा बंड शांत करण्यास महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आता यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष व ओबीसी नेते बापुराव सोलनकर यांनी बारामतीत दोन्ही पवारांचा पराभव होईल असा इशारा दिला आहे. तसेच बारामतीत बहुजन समाजाचा उमेदवार निवडून येईल. अशी अशाही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी सोलनकर यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर देखील जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…मोहोळांना विजयी करण्यासाठी सर्व आघाड्या लागल्या कामाला ; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका सुरू
बारामती लोकसभा मतदार संघामध्ये धनगर, ओबीसी, बहुजन समाजाचे मतदान 12 लाखांच्यावर आहे, त्यामुळे धनगर, ओबीसी, भटके, या समाजाची लोकसंख्या बहुजन समाजाचा उमेदवार निवडून येण्यासाठी पुरेसे आहे, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी या प्रमाणे बहुजन समाजाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. परंतु महाराष्ट्रातील प्रस्थापित वेवस्थेने बहुजन समाजाला कधीही पुढे येऊ दिले नाही, स्वतःच्याच पाहुणे रावळे यांचा विकास केला. असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांचा मुलगा लोकसभेत पाठवा ; समाधान दादा आवताडे यांचं जनतेला आवाहन
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिक्षण संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंका, यांच्या माध्यमातून लोकांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बहुजन समाजाने आपले मत देताना विचार करायला पाहिजे, निवडणुकीमध्ये गोड बोलून मते घेतील आणि पुन्हा घराणेशाही आणखी बळकट करतील. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला आहे. त्याचा प्रभावी वापर करावा, अन्यथा गुलामगिरी आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल, पवार घराण्याने नेहमी झोडा आणि तोडा ही भूमिका घेतली आहे, त्यामुळे आज त्यांना दारोदारी फिरावे लागतंय, डॉ बाबासाहेबांनी मतदारांना खऱ्या अर्थाने राजा बनवले आहे, राजा सारखे रहा. असे यावेळी बापूराव सोलकर यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय
हेही वाचा…“रोहित पवारांनी आता फक्त स्वत:ची आमदारकी सांभाळावी”, भाजपचा रोहित पवार उपरोधिक टोला
हेही वाचा…“कामगारांचा मुलगा अन् विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी”, लढाई जिंकणार कशी ? राम सातपुते यांनी सांगितली रणनिती
हेही वाचा…“बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न यावेळी अजित पवार पुर्ण करणार का ?” महाराष्ट्रातील यंदाची सर्वात लक्षवेधक लढत
हेही वाचा…शिंदे कुटुंबीयांना आम्ही वैतागलोय, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात मोठा रोष