छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास १७ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज झालेत. मध्यंतरी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्यात. मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण ठाकरेंचंचं काम करणार असून कोणत्याही व्यक्तीचा काम करणार नसल्याचे म्हटले होते. यावरून त्यांनी थेट खैरे यांच्यावर निशाणा साधला. मात्र आज थेट अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवें अन् खैरे वाद संपुष्टात आल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…शिंदे कुटुंबीयांना आम्ही वैतागलोय, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात मोठा रोष
छत्रपती संभाजीनगरमधून अंबादास दानवे देखील निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र ठाकरेंनी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर दानवे नाराज होऊन आपण चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र आज चक्क अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांच्या संभाजीनगरमधील डेक्कन निवासस्थानी बुके घेऊन पोहचले. यावेळी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांना पेढा भरवत निवडणुकीच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर चंद्रकांत खैरे अन् अंबादास दानवे यांच्या वाद संपला असल्याचे दिसून आले.
हेही वाचा…मोहोळांना विजयी करण्यासाठी सर्व आघाड्या लागल्या कामाला ; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका सुरू
दरम्यान, मागील दहा वर्षापासून अंबादास दानवे लोकसभेची तयारी करीत होते. यातच प्रत्येक निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्याकडून डावलण्यात आल्याचे दानवे यांनी बोलून दाखवले. तर मागच्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्यामुळेच माझा पराभव झाला. असे चंद्रकांत खैरे यांनी वारंवार सांगितले. मध्यंतरी चंद्रकांत खैरे यांनी मागील आठवड्यात प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला दानवेंना बोलावले नसल्याने हा वाद आणखी वाढला होता. मात्र आजच्या भेटीनंतर सर्व काही आलबेल असल्याचे दोघांकडून दाखवण्यात आले.
READ ALSO :
हेही वाचा…“पवार घराण्याने नेहमी झोडा आणि तोडा भूमिका घेतलीय”, पण आता..,” यशवंत ब्रिगेडने बारामतीत दोन्ही पवारांना दिलं आव्हान
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय
हेही वाचा…“रोहित पवारांनी आता फक्त स्वत:ची आमदारकी सांभाळावी”, भाजपचा रोहित पवार उपरोधिक टोला
हेही वाचा…“कामगारांचा मुलगा अन् विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी”, लढाई जिंकणार कशी ? राम सातपुते यांनी सांगितली रणनिती
हेही वाचा…“बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न यावेळी अजित पवार पुर्ण करणार का ?” महाराष्ट्रातील यंदाची सर्वात लक्षवेधक लढत