पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडतांना दिसत आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात करून दिली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत. अशी नाराजी आता लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून दिसू लागली आहे.
हेही वाचा…हिंगोलीतील उमेदवार बदलण्याच्या मागणीला जोर, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा कडाडून विरोध
2019 साली अमोल कोल्हे यांना पहिल्यांदाच लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यात ते निवडून आलेत. अभिनेता ते खासदार असा अमोल कोल्हे यांचा आजपर्यंत प्रवास राहिला आहे. मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे आपल्याच मतदारसंघात फिरकले नसल्याची भावना आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यातच गंगापुर-शिनोली फाट्यावर लोकांनी खासदाराची चांगलीच पोलखोल केली असून कोल्हे यांच्या विरोधात बॅनरही लागले आहेत.
हेही वाचा…“आधी प्रचार करणार नाही म्हणाले, अन् आज थेट पेढे घेऊन दानवे खैरेंच्या घरी,” एकच चर्चा
खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हे यांचा जनतेशी पाहिजे तसा जनसंपर्क राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. जनतेने देखील मोठ्या अपेक्षाने अमोल कोल्हे यांना भरभरून मतदान केले. मात्र त्याबाबत त्या जनतेला भरघोस आणि ठोस असे काहीही मिळाले नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्याचा फटका देखील अमोल कोल्हे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गंगापुर शिनोली फाट्यावर एक बोलका पोस्टर लागला आहे. त्यात विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता ? कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? पाच वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला ? असा सवाल करत खासदार साहेब उत्तर द्या. अशी विनंती करण्यात आली आहे. त्यात एक सुज्ञ मतदार असा उल्लेख करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ
हेही वाचा…“एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक ठरणार”, तुम्ही इंडिया आघाडीला निवडा,” उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन
हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढत अटळ, कॉंग्रेस अन् भाजपमध्ये वंचित ठरणार गेम चेंजर ?
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय
महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० तोफा धडाडणार ! लोकसभेसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
हेही वाचा…कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंची डोकेदुखी वाढली ; सोलापुर लोकसभेतून वंचित उमेदवार देणार ?