वर्धा : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वर्ध्यातून माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या मंगळवारी माजी आमदार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज सादर केला जाणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकसभा निवडणुकीचा आरंभ तुतारी फुंकून करूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा…५ वर्षामध्ये मतदारसंघांमध्ये का नव्हता? आता प्रचारासाठी वेळ कसा भेटला ? कोल्हेंविरोधात मतदारांची प्रंचड नाराजी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे २ एप्रिल रोजी निघणाऱ्या अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काळे यांनी हा दिवस निश्चित केला आहे. या दिवशी काळे यांच्या आई अनुराधाताई शरद काळे यांचा स्मृतिदिन आहे. आईच्या स्मृतीस अभिवादन करीत आपण निवडणूक कार्यास आरंभ करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ
मात्र या रॅलीत आता पक्षाचे सर्वेसर्वो शरद पवार हे पण उपस्थित राहून काळे यांना आशीर्वाद देणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून आज कळविण्यात आले आहे. पक्षनेते अतुल वांदिले तसेच इंडिया आघाडीचे निमंत्रक अविनाश काकडे यांनी पवार यांची हजेरी निश्चित असल्याचे सांगितले. तसेच माजी मंत्री अनिल देशमुख पण उपस्थित राहणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोहिते पाटलांचा अमोल कोल्हेंवर जोरदार प्रहार ; ती टिका भोवली, घेतला चांगलाच समाचार
हेही वाचा…सातारच्या जागेवर शरद पवार यांचा नवा डाव ; माजी मुख्यमंत्र्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार ?
हेही वाचा…वैद्यकीय क्षेत्रात देशाची प्रगती ; म्हणून मोदींना साथ ! सोलापूरमधील डॉक्टरांच्या भावना : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी साधला संवाद
हेही वाचा…“भारत मातेशी गद्दारी करणे हे कॉंग्रेसच्या रक्तात”, पुलवामा हल्ल्याच्या टिकेवरून सातुपते यांचं शिंदेंना जशात तसं उत्तर
हेही वाचा…“बापू..! तुम्ही म्हणजे ‘फाडा पोस्टर, निकला चुहा’ ?”, शिवतारेंच्या विरोधातलं ‘ते’ पत्र व्हायरल
हेही वाचा…भाजपचा ‘तो’ मेगा प्लॅन सक्सेस ; लोकसभेपुर्वी विरोधी पक्षातील हजारो नेत्यांना भाजपात खेचले !