अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला याआधी शिवसेना शिंदे गटाने कडाडून विरोध केला होता. त्यासह मित्र पक्ष असलेल्या प्रहाराचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तर राणांच्या विरोधात शड्डूच ठोकला आहे. यातच आता नवनीत राणा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण प्रचारात आपला फोटो न वापरण्याचे थेट आदेशच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यानी दिला आहे. याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…“बापू..! तुम्ही म्हणजे ‘फाडा पोस्टर, निकला चुहा’ ?”, शिवतारेंच्या विरोधातलं ‘ते’ पत्र व्हायरल
महायुतीच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच प्रचार करत असताना नवनीत राणा या भाजप नेत्यांसह महायुतीतील मित्र पक्षातील नेत्यांच्या फोटोचा वापर करतांना दिसत आहेत. अशातच अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांनी थेट पत्रच लिहून प्रचाराच्या पोस्टरवर फोटो आणि नावाचा वापर करू नये असे म्हटले आहे.
हेही वाचा…भाजपचा ‘तो’ मेगा प्लॅन सक्सेस ; लोकसभेपुर्वी विरोधी पक्षातील हजारो नेत्यांना भाजपात खेचले !
संजय खोडके यांनी याबाबत थेट एक पत्रच लिहिलं आहे. या पत्रात लोकसभा निवडणुकीत माझ्या फोटोचा व नावाचा वापर करू नये, आपण माझ्या फोटोचा वापर ज्या ज्या मीडियात केलेला आहे. तेथून त्वरीत काढून मीडियामध्ये त्या संदर्भात आपण आपले निवेदन सोशल मीडिया व प्रिंट मीडियामध्ये करावे. जर याबाबत आपण माध्यमांवर निवेदन केले नाही तर मला कायदेशीर कारवारी करावी लागेल असा इशाराच त्यांनी राणांना दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…राजकीय गणितं सांगताहेत, पुण्यात धंगेकरांपेक्षा मुरलीधर मोहोळच वरचढ
हेही वाचा…शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून होणार, अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी होणार
हेही वाचा…मोहिते पाटलांचा अमोल कोल्हेंवर जोरदार प्रहार ; ती टिका भोवली, घेतला चांगलाच समाचार
हेही वाचा…सातारच्या जागेवर शरद पवार यांचा नवा डाव ; माजी मुख्यमंत्र्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार ?
हेही वाचा…वैद्यकीय क्षेत्रात देशाची प्रगती ; म्हणून मोदींना साथ ! सोलापूरमधील डॉक्टरांच्या भावना : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी साधला संवाद
हेही वाचा…“भारत मातेशी गद्दारी करणे हे कॉंग्रेसच्या रक्तात”, पुलवामा हल्ल्याच्या टिकेवरून सातुपते यांचं शिंदेंना जशात तसं उत्तर