नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथे खासदार अशोक चव्हाण भाजपच्या प्रचारासाठी आले होते. मात्र यावेळी मराठा समाज बांधवानी अशोक चव्हाण यांच्या गाडीला घेराव घातला. तसेच एक मराठा- लाख मराठा अशी घोषणाबाजी करत अशोक चव्हाण यांना गावातून परत जाण्यासाठी भाग पडले. यावर आता अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून होणार, अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी होणार
प्रचार करण्यासाठी आलेल्या अशोक चव्हाण यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजी सुरू असतांना अशोक चव्हाण पोलिसांच्या मध्यस्तीने मराठा बांधवांच्या गराड्यातून त्यांची गाडी बाहेर काढण्यात आली. त्यानतंरही मराठा बांधवांकडून मराठा आरक्षणासंदर्भाने नारेबाजी सुरूच होती. भाग गया रे भाग गया रे अशोक चव्हाण भाग गया. अशीही घोषणाबाजी काही मराठा बांधवांनी यावेळी केली.
नांदेडचे लोकसभा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारासाठी अशोक चव्हाण गावात आले होते. त्यावेळी, मराठा समाज बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत खासदार चव्हाण यांना गावातून परत फिरण्यास भाग पाडले.
हेही वाचा…मोहिते पाटलांचा अमोल कोल्हेंवर जोरदार प्रहार ; ती टिका भोवली, घेतला चांगलाच समाचार
दरम्यान, या संपुर्ण घटनेवर अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज कोंढा, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे नारेबाजी झाली. हा प्रकार राजकीय आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काम करत आहोत, पुढेही करत राहू. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की या विषयावर राजकारण करायचे नाही.
मात्र, वैयक्तिक स्वार्थापोटी काही मोजके लोक गैरसमज निर्माण करून समाजाची दिशाभूल करत आहेत. हा मराठा आरक्षणाची चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा मंडळींना लोक सुद्धा चांगलेच ओळखून आहेत. असही त्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना शिंदे गटाचे ‘दोन’ उमेदवार बदलणार ? भाजपसह मित्र पक्षांच्या नेत्यांचा उमेदवारीला प्रखर विरोध
हेही वाचा…“भाजपच्या उमेदवाराला अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा विरोध, महायुतीत वाद आणखी वाढतच चाललाय”
हेही वाचा…महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अजूनही तसाच, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक
हेही वाचा…हिंदुत्वाची धगधगती मशाल असलेल्या ‘पतित पावन संघटने’चा मोहोळांना पाठिंबा
हेही वाचा…नवनीत राणांना अजितदादांच्या नेत्याचा विरोध, थेट कारवाई करण्याचा दिला इशारा
हेही वाचा…राजकीय गणितं सांगताहेत, पुण्यात धंगेकरांपेक्षा मुरलीधर मोहोळच वरचढ