सोलापुर : सोलापुर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापुर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या संवाद मेळाव्यातून माजी मंत्री सुभाष बापु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना जिंकून आणण्यासाठी एकत्रित लढण्याचे आवाहन सुभाष बापू देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले.
हेही वाचा…नवनीत राणांना अजितदादांच्या नेत्याचा विरोध, थेट कारवाई करण्याचा दिला इशारा
यावेळी सुभाष देशमुख म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपसाठीच नाही तर देशाच्या भविष्यासाठीही महत्वाची आहे. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक घटकाने आपलं योगदान द्यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करताना सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पडावे, यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन सुभाष बापू देशमुख यांनी केले.
तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे भाजपचा भव्य कार्यकर्ता मेळावाही पार पडला. या मेळाव्याला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांना काही कानमंत्र दिला. यावेळी ते म्हणाले की, सोलापुर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करा. अब की बार, ४०० पार चा यावेळी त्यांनी नाराही दिला. तर गेल्या १० वर्षात मोदी यांच्या नेतृत्वात सोलापुर जिल्ह्याचा झालेला विकास कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा…राजकीय गणितं सांगताहेत, पुण्यात धंगेकरांपेक्षा मुरलीधर मोहोळच वरचढ
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात फक्त आणि फक्त कमळ फुलणार ; वडगाव शेरीतील मेळाव्यात महाविजयाचा निर्धार
हेही वाचा…“भाग गया रे भाग गया रे अशोक चव्हाण भाग गया”, अन् प्रचारासाठी आलेले अशोक चव्हाण धुम ठोकून पळाले
हेही वाचा…शिवसेना शिंदे गटाचे ‘दोन’ उमेदवार बदलणार ? भाजपसह मित्र पक्षांच्या नेत्यांचा उमेदवारीला प्रखर विरोध
हेही वाचा…“भाजपच्या उमेदवाराला अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा विरोध, महायुतीत वाद आणखी वाढतच चाललाय”
हेही वाचा…महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अजूनही तसाच, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक
हेही वाचा…हिंदुत्वाची धगधगती मशाल असलेल्या ‘पतित पावन संघटने’चा मोहोळांना पाठिंबा