अमरावती : अमरावती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात महायुतीच्या नेत्यांच्या नाराजीचा सुर कायम दिसून येत आहे. प्रचारासाठी माझा फोटो वापरू नये, अन्यथा कारवाई करू असा थेट इशारा अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना दिला होता. यातच आता भाजपचे नेते आणि महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी देखील नवनीत राणा यांच्याविरोधातली नाराजी उघडउघड बोलून दाखवली आहे. त्यामुळे अमरावतीच्या राजकारणात महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे दिसून येऊ लागले आहे.
हेही वाचा…“भाग गया रे भाग गया रे अशोक चव्हाण भाग गया”, अन् प्रचारासाठी आलेले अशोक चव्हाण धुम ठोकून पळाले
सुरूवातीपासून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीतील मित्र पक्षांचा विरोध दिसून आला. नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे भाजपचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नाराज नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला असला, तरी भाजपचे नेते आणि महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी विरोधी सूर कायम ठेवला आहे. पक्षनिष्ठा हे आमचे भांडवल आहे, कमजोरी नव्हे. कुणीही यावे आणि टपली मारून जावे, इतके आम्ही कमकुवत नाही, असे तुषार भारतीय यांनी सांगितले.
हेही वाचा…शिवसेना शिंदे गटाचे ‘दोन’ उमेदवार बदलणार ? भाजपसह मित्र पक्षांच्या नेत्यांचा उमेदवारीला प्रखर विरोध
तुषार भारतीय यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी तुषार भारतीय यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे आम्ही नाराज नसून दु:खी आहोत. नाराजी दूर करता येईल, पण आम्हाला मनापासून झालेले दु:ख दूर करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका तुषार भारतीय यांनी मांडली.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या विरोधात भाजपसह अजित पवार गटातील नेत्यांची नाराजी जाहीरपणे दिसून आली आहे. अशातच आता महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने तर थेट राणांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या तीन एप्रिलला प्रहार संघटनेकडून दिनेश बुब यांचा उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे. त्यामुळे अमरावतीत आता चांगलीच लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले”, महाराष्ट्र्तील शेतकरी नेता निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…तिकीट नाकारलं, ठाकरे गटात होणार दाखल, ? जळगावात भाजपचाच खासदार स्मिता वाघ यांना देणार ठक्कर
हेही वाचा…“यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार”, आढळरावांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा शिरूरमध्ये निर्धार
हेही वाचा…अकोल्यात आबंडेकरांविरोधात कॉंग्रेसने दिला उमेदवार ; डॉ. अभय पाटील यांना तिकीट,आंबेडकरांची दुहेरी भूमिका
हेही वाचा…“सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पाडा, सर्वांनी एकजुटीने लढा,” सुभाष देशमुख यांचं आवाहन
हेही वाचा…पुण्यात फक्त आणि फक्त कमळ फुलणार ; वडगाव शेरीतील मेळाव्यात महाविजयाचा निर्धार