मुंबई : जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलण्यात आलं. त्याठिकाणी भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर उन्मेष पाटील नाराज झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यातच आज उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…पुण्यात फक्त आणि फक्त कमळ फुलणार ; वडगाव शेरीतील मेळाव्यात महाविजयाचा निर्धार
लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीत अनेक जण नाराज असल्याचे दिसून येत आहे. यातच जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने त्यांची पक्षांतर्गत नाराजी दिसून आली. आज पाटील यांनी राऊतांची भेट घेतली. मात्र संजय राऊत आणि मी संसदेत एकत्रित काम केलं आहे. त्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. येत्या काही दिवसात यावर सविस्तर बोलेन अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा…“भाग गया रे भाग गया रे अशोक चव्हाण भाग गया”, अन् प्रचारासाठी आलेले अशोक चव्हाण धुम ठोकून पळाले
स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर जळगावात भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहेत. उन्मेष पाटील यांनी राऊतांची भेट घेतल्यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यातच उन्मेष पाटील यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे गटात दाखल होतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे आला आहे. ठाकरे गटाकडून याठिकाणी अद्याप कोणताही उमेदवार ठरलेला नाहीय. त्यामुळे ठाकरे गटाकडून जर उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली तर भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना मोठा फटका बसू शकतो. कारण गेल्या पाच वर्षात उन्मेष पाटील यांनी कार्यकर्त्यांचं मोठं जाळं उभं केलं आहे. यासह त्यांना महाविकास आघाडीची ताकद असणार आहे.त्यामुळे या निवडणुकीत जळगावचं चित्र बदलण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नवनीत राणांच्या विरोधात महायुतीच्याच नेत्यांनी नाराजीचा सुर आवळला”, अमरावतीत महायुतीला मोठा फटका बसणार
हेही वाचा…“एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले”, महाराष्ट्र्तील शेतकरी नेता निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…तिकीट नाकारलं, ठाकरे गटात होणार दाखल, ? जळगावात भाजपचाच खासदार स्मिता वाघ यांना देणार ठक्कर
हेही वाचा…“यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार”, आढळरावांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा शिरूरमध्ये निर्धार
हेही वाचा…अकोल्यात आबंडेकरांविरोधात कॉंग्रेसने दिला उमेदवार ; डॉ. अभय पाटील यांना तिकीट,आंबेडकरांची दुहेरी भूमिका
हेही वाचा…“सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पाडा, सर्वांनी एकजुटीने लढा,” सुभाष देशमुख यांचं आवाहन