वर्धा : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर काळे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीकडून भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या भव्य नामाकंन रॅलील शरद पवारांनी उपस्थिती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशात सुरू असलेला सत्तेचा गैरवापर व दडपशाही यावर शरद पवारांनी प्रखर भाष्य केले. तसेच तसेच अमर काळे यांना लोकसभेवर निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले.
शरद पवार म्हणाले की, आज देशाचं राजकार, देशाचा अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे, त्यांना जी शक्ति दिली गेली आहे. त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे आज या देशामध्ये एक अघोषीत आणीबाणी आपल्याला बघायला मिळते. आज सत्तेचा गैरवापर होत आहे. विरोधी विचार दाबला जात आहे. झारखंड सारख्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री,केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तुरूंगामध्ये टाकलं.
हेही वाचा…“एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले”, महाराष्ट्र्तील शेतकरी नेता निवडणुकीच्या रिंगणात
दिल्लीचं राज्य हे आम आदमी पार्टीकडे आहे. त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्रांच्या भूमिकेला सहकार्य करत असतानाहा सुद्धा राजकीय विचार हा मोदी मान्य करत नाही, ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरूंगामध्ये टाकलेलं आहे. त्यांचे तीन मंत्री तुरूंगात आहेत. कोलकत्यामध्येही ममती बॅनर्जी यांच्या मंत्री मंडळातील दोन लोक आज तुरूंगात आहेत. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…तिकीट नाकारलं, ठाकरे गटात होणार दाखल, ? जळगावात भाजपचाच खासदार स्मिता वाघ यांना देणार ठक्कर
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाच्या बॅंकेची खाती गोठवून त्यांचा व्यवहार थांबवण्याची भूमिका आज भाजप सरकारने केलेली आहे. ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती, आज ती या ठिकाणी निर्माण केलीय. लोकशाहीला आघात देणारी, मुलभूत अधिकार उद्धवस्त करणारी, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणाऱ्या विचारधारेचा पराभव करणं आणि या देशाच्या जनतेचं भविष्य हे योग्य राहिल याची काळजी घेणं हेच काम आपल्याला करायचं आहे व त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.आघाडीतील पक्षांच्या सामुदायिक सहकार्याने व कर्तृत्वाने आपण वर्ध्यातून एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू असेही शरद पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’, भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा*
हेही वाचा…“मिंधे गटातील अनेकांची तिकीटे कापली जाणार”, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टिका
हेही वाचा…“पवारांच्या नावानं मत मागण्याचे दिवस गेलेत, आता तुमच्या कामाचा हिशोब द्या “, आढळरावांनी कोल्हेंचा घेतला खरपुस समाचार
हेही वाचा…तिकीट कापलेले भाजप खासदार थेट राऊतांच्या भेटीला , जळगावात मोठा राजकीय भुंकप ?
हेही वाचा…“नवनीत राणांच्या विरोधात महायुतीच्याच नेत्यांनी नाराजीचा सुर आवळला”, अमरावतीत महायुतीला मोठा फटका बसणार