मुंबई : लोकसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर महायुतीतील अनेक मित्र पक्षातील नेते नाराज असल्याचे दिसून आले आहेत. यातच शिवसेना शिंदे गटातील काही मतदारसंघात उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हातगणंकलेतून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील राव माने तर हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र दोन्ही उमेदवारांना प्रचंड विरोध होत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…अकोल्यात आबंडेकरांविरोधात कॉंग्रेसने दिला उमेदवार ; डॉ. अभय पाटील यांना तिकीट,आंबेडकरांची दुहेरी भूमिका
लोकसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांची घोषणा केली आहे. तर काही मतदारसंघात उमेदवारी घोषीत झाल्यानंतर आता शिंदेंच्या उमेदवारांना प्रचंड विरोध केला जात आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला चांगलचं डिवचलं आहे. मिंधे गटाचे नेते गद्दार आहेत. ते कुणाचेच होऊ शकत नाहीत. लोकसभा मतदानाची तारिख जवळ येऊनही अद्याप जागावाटप करण्यात आलेले नाही. याचे कारणच असे की मिंधे गटातील अनेकांची तिकीटे कापली जाणार आहेत. असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
हेही वाचा…“सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पाडा, सर्वांनी एकजुटीने लढा,” सुभाष देशमुख यांचं आवाहन
यवतमाळ-वाशिम लोकसभेत शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आहेत. मात्र त्यांचीही उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही. यावर बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सर्व होत असताना यवतमाळ-वाशिममध्ये अद्यापही एनडीएचा उमेदवारच ठरलेला नाही. ते भ्रष्ट उमेदवार देणा की , कोण नवीन चेहरा येणार ? हा एक प्रश्न आहे. असेही त्यांनी सांगितले. तर आपण यवतमाळमध्ये सभा घेऊन प्रचार सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले
दरम्यान, सध्या महायुतीत नाशिक, ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवरून मोठा वाद सुरू झाला आहे. तर हिंगोली आणि हातगणंकलेच्या जागेबाबत भाजपकडून उमेदवार बदलण्याची मागणी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“पवारांच्या नावानं मत मागण्याचे दिवस गेलेत, आता तुमच्या कामाचा हिशोब द्या “, आढळरावांनी कोल्हेंचा घेतला खरपुस समाचार
हेही वाचा…तिकीट कापलेले भाजप खासदार थेट राऊतांच्या भेटीला , जळगावात मोठा राजकीय भुंकप ?
हेही वाचा…“नवनीत राणांच्या विरोधात महायुतीच्याच नेत्यांनी नाराजीचा सुर आवळला”, अमरावतीत महायुतीला मोठा फटका बसणार
हेही वाचा…“एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले”, महाराष्ट्र्तील शेतकरी नेता निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…तिकीट नाकारलं, ठाकरे गटात होणार दाखल, ? जळगावात भाजपचाच खासदार स्मिता वाघ यांना देणार ठक्कर