बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानाची तारीख जशीजशी जवळ येत आहे. तसे राजकीय वातावरण चांगलचं तापत आहे. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा झंझावत सध्या मतदारसंघात जोरदारपणे दिसून येत आहे. यातच आता बारामतीमधी शेतकरी कृती समितीने सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केल्याने याठिकाणी महायुती भक्कम अवस्थेत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय.
गडदरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या नेतृत्वात सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील महायुतीचे कार्यकर्ते व शेतकरी कृती समिती यांचा संयुक्त मेळावा झाला. यानिमित्ताने सतीश काकडे यांनी काकडे गट व शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा…महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहे,” नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
यावेळी बोलताना सतीश काकडे म्हणाले की, ‘‘अजित पवार शब्दाचे पक्के नेते आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विकासाची गंगा, मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्राच्या निधीची गरज आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची जवळीक आहे. त्यामुळे अजित पवार विकासकामे खेचून आणतील. यासाठी सुनेत्रा पवार यांना खासदार करणे आवश्यक आहे,’’
याप्रसंगी प्रमोद काकडे, दिलीप फरांदे, संतोष कोंढाळकर, अजय कदम, शहाजी जगताप, दिग्विजय जगताप, वैभव गायकवाड, हेमंत गायकवाड, सतीश जगताप, भाऊसाहेब हुंबरे, दयानंद चव्हाण, बबलू सकुंडे, सुरेश शेंडकर, हरिभाऊ तावरे, बाळासाहेब राऊत, भाऊसाहेब भोसले, अजित माळशिकारे आदी उपस्थित होते. अभिजित काकडे यांनी मेळाव्याचे संयोजन केले.
READ ALSO :
हेही वाचा…“उध्दव ठाकरे, अन् अनंत गीते यांनी सीएए कायदा काय आहे ? हे जनतेला सांगावे”, तटकरेंनी डिवचलं
हेही वाचा…“लोकसभेची निवडणुक ही तटकरे विरुद्ध गीते एवढी सिमीत नाही तर..” तटकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा….“नरेंद्र मोदी शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना ? “
हेही वाचा….शिरूरमध्ये ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आढळराव पाटील अन् कोल्हेंमध्ये प्रमुख लढत
हेही वाचा…“महाविकास आघाडीचा उमेदवार खोटारडा, मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये:” धनंजय सावंत