मुंबई : जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलण्यात आलं. त्याठिकाणी भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर उन्मेष पाटील नाराज झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यातच आज उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“नवनीत राणांच्या विरोधात महायुतीच्याच नेत्यांनी नाराजीचा सुर आवळला”, अमरावतीत महायुतीला मोठा फटका बसणार
संजय राऊत हे उन्मेष पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असं वाटत नाही की उन्मेष पाटील हे असा काही निर्णय घेतील. मी आज प्रचारांमध्ये. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजुनही ठाम विश्वास आहे की कुठल्याही घडामोडी घडणार नाहीत. उन्मेष पाटील भाजपमध्येच राहितील असा दावा स्मिता वाघ यांनी केलाय.
हेही वाचा…“एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले”, महाराष्ट्र्तील शेतकरी नेता निवडणुकीच्या रिंगणात
कोण कसं जीवन जगावं, हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न असतो. मात्र मी माझ्या तत्वांशी आजपर्यंत तडजोड केली नाही. मी एकनिष्ठ राहिले. पक्षासोबत एक निष्ठा राहणाऱ्या माझ्यासारखया कार्यकर्तेच्या पाठीशी जनता ही उभी राहिल. भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले आणि ते स्वत: उमेदवार असले तरी जनता माझ्या पाठीशी राहिल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“वर्ध्यातून एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू”, ‘आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं पवारांचं आवाहन’
हेही वाचा…भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’, भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा*
हेही वाचा…“मिंधे गटातील अनेकांची तिकीटे कापली जाणार”, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टिका
हेही वाचा…“पवारांच्या नावानं मत मागण्याचे दिवस गेलेत, आता तुमच्या कामाचा हिशोब द्या “, आढळरावांनी कोल्हेंचा घेतला खरपुस समाचार
हेही वाचा…तिकीट कापलेले भाजप खासदार थेट राऊतांच्या भेटीला , जळगावात मोठा राजकीय भुंकप ?