IMPIMP

“राज ठाकरे मोदींच्या चरणी लीन झालेत,” कुणी लगावला टोला ?

Raj Thackeray got absorbed in the feet of Modi

मुंबई : राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या आज तोफा थंडावणार आहेत. अशातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेनंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देतांना दिसत आहेत. यावरून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या चरणी लीन झालेत असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

हेही वाचा…“ही दोस्ती तुटायची नाय, पण हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नको” 

राज ठाकरे यांच्या कोणत्याही शाखा नाहीत. आता संघाच्या मोदींच्या शाखा त्याच त्यांच्या शाखा आहेत. राज ठाकरे मोदींच्या चरणी विलीन झाले आहेत. असा टोलाही राऊतांनी ठाकरेंना लगावला. तर काल नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर गेले. ज्यांनी शिवसेना तोडली, तो त्याठिकाणी जात आहे.  हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा…“तर जय श्रीराम शिवाय यांना काहीच सुचत नाही”, जयंत पाटलांचा खोचक टोला 

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होऊन नरेंद्र मोदी ढोंग करीत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना शाप दिलाय. नरेंद्र मोदी हा खोटारडा माणुस आहे. त्यांच्याबरोबर असणारेही सगळे खोटारडे आहेत. ते सध्या विष पेरण्याचं काम करत आहेत. त्यांना महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात” 

हेही वाचा…“महायुतीचं बटन इतक्या जोरात दाबा की, पाकिस्तानात ‘मातम’ सुरु झाला पाहिजे” 

हेही वाचा…“मी पण ठाकूर, माफी कधीच मागणार नाही, ” हितेंद्र ठाकूरांनी रवींद्र चव्हाणांना दिला कडक इशारा 

हेही वाचा..“हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, शरद पवारांनी मोदींना डिवचलं 

हेही वाचा..“या हुकूमशहाचा विषाणूपासून देशाला वाचवायचे आहे”, ठाकरेंचा मोदींवर जोरदार घणाघात 

Total
0
Shares
Previous Article
In the Lok Sabha elections, the father is in one party and the son is in another party

"लोकसभा निवडणुकीत बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात"

Next Article
Sanjay Kakde took advantage of the arrest warrant, called the complainant and handed over the check

संजय काकडेंनी घेतला अटक वॉरंटचा धसका, तक्रारदाराला बोलवून सुपूर्द केला धनादेश

Related Posts
Total
0
Share