बारामती : बारामतीत यंदा पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार अशी लढत होत आहे. एका बाजूला विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. अशातच आता सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. अशातच एका कार्यक्रमात त्यांनी अजित दादांच्या विचाराच्या खासदारासाठी घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा…“पवारांच्या नावानं मत मागण्याचे दिवस गेलेत, आता तुमच्या कामाचा हिशोब द्या “, आढळरावांनी कोल्हेंचा घेतला खरपुस समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर आपल्याला घड्याळाला मतदान करावं लागेल. अजितदादा नेहमी विकासावर बोलतात. त्यांना फक्त विकास हवा असतो. त्यामुळे तुम्ही कुठेही मतदान करायला जाल. तेव्हा घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा. असे आवाहन महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी लोकांना केले. लोकसभेची निवडणुक जशी जशी जवळ येऊ लागली आहे. तसा तसा बारामतीत प्रचाराला जोर येऊ लागला आहे.
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, केंद्रात आणि राज्यात जर एकाच विचाराचं सराकर असेल तर प्रत्येक योजना या घराघरात पोहचल्या जातात. अजितदादांच्या या विचारांचा खासदार आपल्याला निवडायचा आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर आपल्याला याठिकाणी घड्याळाला मतदान करावं लागेल. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…तिकीट कापलेले भाजप खासदार थेट राऊतांच्या भेटीला , जळगावात मोठा राजकीय भुंकप ?
दरम्यान, यावेळेची निवडणुक जरा वेगळी आहे. महायुतीकडून मला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मतदान करणार आहात. त्याठिकाणी तुम्हाला घड्याळाला मतदान करावं लागेल. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तींचा विकास झाला पाहिजे हा अजितदादांचा विचार आहे. अन् तो विकास आपल्याला हवा असेल तर मोदींची साथ देणे आवश्यक आहे. आपण यावेळी घड्याळाला मतदान केलं तर ते विकासासाठी असणार आहे. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांनी थेट उमेदवाराच्या मिरवणूक रथात बसण्याचा हट्ट केला अन्.. सगळ्यांची तारांबळ उडाली, एकच चर्चा
हेही वाचा…जळगावात भाजपचा खासदार ठाकरे गटाच्या गळाला, स्मिता वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
हेही वाचा…“वर्ध्यातून एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू”, ‘आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं पवारांचं आवाहन’
हेही वाचा…भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’, भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा*
हेही वाचा…“मिंधे गटातील अनेकांची तिकीटे कापली जाणार”, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टिका