अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून शरद पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. अशातच एका कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“वर्ध्यातून एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू”, ‘आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं पवारांचं आवाहन’
अहमदनगर मधून लोकसभेसाठी उभे असलेले महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना डिवचलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे पाटलांनी त्यांचं संसदेतील इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवला. त्यानंतर याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवी तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. असे थेट आव्हानच विखेंनी लंकेंना दिलं. त्यावर आता विखेंना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’, भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
दरम्यान, सुजय विखेंनी केलेल्या टिकेवर पुण्यातील राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चांगलाच समाचार घेतला. आपला बाप मंत्री होता, कारखानदार होता, आपण कॉन्व्हेन्ट मध्ये शिकलात. निलेश लंके यांचे वडील गरीब शेतकरी, लंके स्वतः चहा विकून उदरनिर्वाह करायचे. तुझ्यासारखी श्रीमंत बापाची पोरं गरिबाला हिनवण्यातच समाधान मानतात, विखे मनाने अगदीच भिकारी निघाले. असा जोरदार पलटवार प्रशांत जगताप यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हिंगोलीमध्ये महायुतीत धुसफूस, हेमंत पाटलांची उमेदवारी जाणार, शिंदे अन् भाजपच्या आमदारांमध्ये गुप्त बैठका
हेही वाचा…विकसित भारताचे स्वप्न होणार साकार, “कामगारांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी,” मुरलीधर मोहोळांचे आवाहन
हेही वाचा…“घड्याळाला मत म्हणजे, विकासाला मत”, यंदा अजितदादांच्या विचारांचा खासदार होणार,- सुनेत्रा पवार
हेही वाचा…शरद पवारांनी थेट उमेदवाराच्या मिरवणूक रथात बसण्याचा हट्ट केला अन्.. सगळ्यांची तारांबळ उडाली, एकच चर्चा
हेही वाचा…जळगावात भाजपचा खासदार ठाकरे गटाच्या गळाला, स्मिता वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..