जळगाव : लोकसभा निवडणुकीपुर्वीच महायुतीला धक्क्यावर धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर खासदार उन्मेष पाटील आज ठाकरे गटात दाखल होणार आहेत. यामुळे महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना मोठा फटका बसणार आहे. आज उन्मेष पाटील हजारो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा…“घड्याळाला मत म्हणजे, विकासाला मत”, यंदा अजितदादांच्या विचारांचा खासदार होणार,- सुनेत्रा पवार
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची काल उन्मेष पाटील यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आज मातोश्रीवर उन्मेष पाटील यांच्यासह हजारो समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. उन्मेष पाटील आज सांयकाळी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यातच जळगाव लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडे गेला आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी थेट उमेदवाराच्या मिरवणूक रथात बसण्याचा हट्ट केला अन्.. सगळ्यांची तारांबळ उडाली, एकच चर्चा
दरम्यान, उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असतांना भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जळगावात भाजप कार्यालयात उन्मेष पाटील यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी उन्मेष पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे जळगावातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“वर्ध्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार यांनी केलं”, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“त्यांचा बैलगाड्याशी काहीही संबंध नाही, ते केवळ घोडीवर बसणारे”,आढळरावांकडून कोल्हेंची खरडपट्टी
हेही वाचा…“विखे मनाने अगदीच भिकारी निघाले”, लंकेंवर टिका, शरद पवार गटाकडून सुजय विखेंचा समाचार
हेही वाचा…“हिंगोलीमध्ये महायुतीत धुसफूस, हेमंत पाटलांची उमेदवारी जाणार, शिंदे अन् भाजपच्या आमदारांमध्ये गुप्त बैठका
हेही वाचा…विकसित भारताचे स्वप्न होणार साकार, “कामगारांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी,” मुरलीधर मोहोळांचे आवाहन