IMPIMP

“20 वर्षांपासून आबंडेकरांचा पराभव, यंदाही निवडणुकीच्या रिंगणात,”अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत अटळ

Prakash Ambedkar is losing from Akola Lok Sabha constituency for 20 years.

अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपने माजी खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यातच यंदाही वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले असून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षांप्रमाणे याही वर्षी अकोल्यात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.

हेही वाचा…प्रणिती शिंदेंचं सोलापुरात ताकद वाढली, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपचा पाठिंबा जाहीर

गेल्या अनेक वर्षांपासून अकोल लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील चार टर्म संजय धोत्रे म्हणून याठिकाणी खासदार होते. तर त्याआधी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी दोनदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आहे. १९९७ पासून ते १९८४ पर्यंत या मतदारसंघात कॉंग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं. मात्र भाजपच्या पांडुरंग फुंडकर यांनी कॉंग्रेसच्या वर्चस्वला तडा दिला आणि ती जागा १९८९ साली भाजपकडे खेचून आणली. त्यानंतर सलग तीन टर्म पांडुरंग फुंडकर खासदार राहिले. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी १९९८ साली हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. प्रकाश आंबेडकर यांनी देखील दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र भाजपच्या संजय धोत्रे यांनी अकोला मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणला. तो आजतागायत भाजपकडे राहिला आहे.

हेही वाचा…दिंडोरीत बंडखोरीचे मोठे संकट, महायुतीसह महाविकास आघाडीची वाढली डोकेदुखी 

मागील लोकसभेच्या सर्व निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या किंवा दुसऱ्या क्रमांकाची मत मिळाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळेच याठिकाणी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाहीय. त्याचा फायदा आपुसकच भाजपला झालेला दिसून येत आहे. यंदाही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जातील अशी शक्यता होती. मात्र आंबेडकरांनी नरमाईची भूमिका घेतल्याने युती विस्कटली आणि वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. आता याठिकाणी पुन्हा तिरंगी होत असून  या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलंय.

दरम्यान, तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा, त्याचा मोबदला तुम्हाला कधीतरी मिळतो. आज प्रकाश आंबेडकरांच्या मागे प्रत्येक जात समुह ताकदीनिशी उभी आहे. त्यांनी नेहमीच समाजहिताची बाजू मांडली आहे. हीच गोष्ट अग्रभागी ठेवून वेळी देखील त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत, भाजपला हरविण्यासाठी मविआतील काही पक्षआंना पाठिंबा जाहीर केलाय. वास्तविक पाहता गेल्या २० वर्षांपासून आंबेडकरांना ज्यांनी निवडून येऊ दिले नाही. तरी देखईल त्यांनी पाठिंबा जाहीर केला हे आपण समजून घेतले पाहिजे. अशी पोस्ट वंचितने सोशल मीडियावर टाकलीय.

READ ALSO :

हेही वाचा…“दिलेली उमेदवीरीही कापतात अन् सेनापती म्हणून बसवलेले बोलके बाहुले सगळं गुपगुमान ऐकतात”, शिंदेंना डिवचलं 

हेही वाचा…“मै मैरी झांशी नही दुंगी”, तिकीट कापलं, भावना गवळी आक्रमक, आज उमेदवारी अर्ज भरणार ?

हेही वाचा..“खासदार करणारेच शिवसैनिक श्रीकांत शिंदेंचा पराभव करतील,”उमेदवारी जाहीर, ठाकरेंची वाघीण कडाडली 

हेही वाचा…“आम्ही त्यांच्याहून जास्त हार्ड बोलू शकतो,” कॉंग्रेसचा उद्धव ठाकरेंवर पलटवार 

हेही वाचा…उमेदवारी जाहीर होऊन पत्ता कट होणार ; शिंदेंवर नामुष्की, हेमंत पाटलांच्या जागी ‘हा’ उमेदवार जाहीर ?

Total
0
Shares
Previous Article
Even the given candidates are cut and the talkative puppets installed as generals listen to all the secrets.

"दिलेली उमेदवीरीही कापतात अन् सेनापती म्हणून बसवलेले बोलके बाहुले सगळं गुपगुमान ऐकतात", शिंदेंना डिवचलं

Next Article
The Pawar family has always taken the position of Zoda and Toda", but now the Yashwant Brigade has challenged

"घड्याळ तात्पुरतं, अन् वेळ वाईट", कोर्टाने फटकारलं, शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं

Related Posts
Total
0
Share