सोलापुर : महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरूवात केली आहे. प्रणिती शिंदे यांच्यापुढे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचं मोठं आवाहन असणार आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे सोलापुरात आता आप कार्यकर्त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे.
हेही वाचा…“फडणवीसांनी दुसरी चाल रचलीय, शिंदेंचाही माणूस सामील”, जरांगे पाटलांनी दिला कडक इशारा
लोकसभेची ही निवडणूक देशाचे संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी महत्वाची आहे. त्यामुळे केंद्रीय हुकूमशाहीच्या विरोधातील हा लढा लढण्यासाठीच सोलापुरात आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीला पाठिंबा असल्याचे मत आपचे जिल्ह्याध्यक्ष महादेव मोरे पाटील यांनी व्यक्त केलंय. इंडिया आघाडीकडून सोलापुरात प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीनेही आपला पाठिंबा जाहीर केलाय.
हेही वाचा…“नाहीतर तुमचेच बारा वाजतील”, लंकेंवर टिका करणाऱ्या सुजय विखेंचा घेतला पवारांनी समाचार
दरम्यान, या पाठिंब्याच्या कार्यक्रमावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. खतीब वकील, शहराध्यक्ष निहाल किरनळ्ळी, युवाध्यक्ष नीलेश संगेपाग, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, जिल्हा महासचिव सतीश लोंढे-पाटील, शहर खजिनदार सुचित्रा वाघमारे, जिल्हा प्रवक्ते बंडू मोरे, उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, अनिल वाले, प्रमोद अवताडे, बसवराज सारंगमठ, रविकांत शिरगिरे, आंनद जाधव,अजय दारलू, अल्ताब तांबोळी, आकाश गायकवाड, प्रसाद बाबानगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…दिंडोरीत बंडखोरीचे मोठे संकट, महायुतीसह महाविकास आघाडीची वाढली डोकेदुखी
हेही वाचा..“दुर्दैवाने किमंत मिळाली नाही” अन्, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांनी भावनांना वाट करून दिली
हेही वाचा…“समोर पाचशे कोटींचा मालक, अन् त्यांच्यासमोर आपल्याला लढायचं,” राणांच्या विरोधात कडूंनी ठोकला शड्डू
हेही वाचा…पक्ष फुटीत निष्ठावंत राहिल्या, आता लोकसभेची लॉटरी, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची वाघीण मैदानात
हेही वाचा…“भाजपने तिकीट नाकारलं, ठाकरे गटात प्रवेश, पण ठाकरेंनी घोषीत केला ‘हा’ वेगळाच उमेदवार”