ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यातच ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या बाजुला कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी वैशाली दरेकर विरूद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत अटळ झाली आहे.
हेही वाचा…“त्यांचा बैलगाड्याशी काहीही संबंध नाही, ते केवळ घोडीवर बसणारे”,आढळरावांकडून कोल्हेंची खरडपट्टी
जळगाव लोकसभेचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. सुरूवातीला उन्मेष पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येईल असे सांगण्यात येत होते. मात्र त्याठिकाणी पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हातगणंकलेतून राजू शेट्टी मशाल चिन्हावर निवडणुक लढण्यास तयार नसल्याने त्याठिकाणी सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिलीय. तर पालघरमध्ये भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा…“विखे मनाने अगदीच भिकारी निघाले”, लंकेंवर टिका, शरद पवार गटाकडून सुजय विखेंचा समाचार
दरम्यान, कल्याण लोकसभेची निवडणुक यंदा चांगलीच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. याठिकाणी ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना संधी दिलीय. २००९ साली वैशाली दरेकर या मनसेकडून लोकसभा निवडणुकीला उभ्या होत्या. तेव्हा त्यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली होती. तर २०१० साली कल्याण डोंबिवली मनपामधअये मनसे तर्फे त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कल्याण डोंबिवली मनपा पद भुषवले. तर २००९ च्या अगोदर त्या शिवसेनेत होत्या. पुन्हा मनसे सोडून त्या शिवसेनेत आल्या. तर पक्ष फुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेतच राहिल्या अन् त्यांना आता लोकसभेची लॉटरी लागली.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपने तिकीट नाकारलं, ठाकरे गटात प्रवेश, पण ठाकरेंनी घोषीत केला ‘हा’ वेगळाच उमेदवार”
हेही वाचा…“फडणवीसांनी दुसरी चाल रचलीय, शिंदेंचाही माणूस सामील”, जरांगे पाटलांनी दिला कडक इशारा
हेही वाचा“नाहीतर तुमचेच बारा वाजतील”, लंकेंवर टिका करणाऱ्या सुजय विखेंचा घेतला पवारांनी समाचार
हेही वाचा…अखेर ठरलं..! भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाकडून उमेदवारी, आज ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…“वर्ध्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार यांनी केलं”, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल