मुंबई : जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. महायुतीकडून उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर उन्मेष पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येईल असे सांगितलं जात होतं. मात्र आज जळगावमधून पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात आता नवा अध्याय बघायला मिळणार आहे.
हेही वाचा…“विखे मनाने अगदीच भिकारी निघाले”, लंकेंवर टिका, शरद पवार गटाकडून सुजय विखेंचा समाचार
उन्मेष पाटील यांना लोकसभेत नाकारल्यानंतर त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येईल अशई चर्चा होती. मात्र त्याठिकाणी करण पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकारणात याची एकच चर्चा सुरू झाली आहे. जळगावसह ठाकरे यांनी आज चार उमेदवारांची घोषणा केली आहे.
हेही वाचा…“हिंगोलीमध्ये महायुतीत धुसफूस, हेमंत पाटलांची उमेदवारी जाणार, शिंदे अन् भाजपच्या आमदारांमध्ये गुप्त बैठका
कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राजु शेट्टी यांनी मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय. तर पालघरमध्ये भारती कामडी तर जळगावमधून करण पवार यांच्या उमेदवारीची घोषणा आज उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
कोण आहेत करण पवार ?
करण पवार पारोळ नगरपालिकेत भाजपकडून नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे. त्याअगोदर त्यांनी एरंडोल विधानसभेसाठी तयारी केली होती. यात पारोळा- एरंडोलचे माजी आमदार भास्कररावपाटील यांचे नातू आहेत. सर्व पक्षांमध्ये संबंध, मराठा समाजाचा तरूण चेहरा म्हणून त्यांची ओळख राहिली आहे.
उन्मेष पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा आज मातोश्रीवर पार पडला. यावेळी बोलतांना त्यांनी महायुतीवर जोरदार टिका केली. आज माझ्याकडे देण्यासाठी काही नाही. तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले, ५० खोके एकदम ओके अशी आहे. जळगावात गद्दारी झाली. पण तुम्ही काम करण्याच्या निष्ठेने इथे आलात. नेहमी सत्तेकडे लोक जातात. पण तुम्ही जनतेची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेसोबत आला. तुमचं आमचं ध्येय एक आहे, आपला भगवा एक आहे. मध्यंतरी आपली फसगत झाली, पण फसवूक केली, त्यांना निवडून द्यायचं नाही. आता शिवछत्रपतींचा अस्सल भगवा जळगावातून संसदेवर जाणार. आपण एकत्र वाटचाल करु, विकासाच्या मध्ये येतील त्यांची वाट लावू” असा इशारा ठाकरे यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीसांनी दुसरी चाल रचलीय, शिंदेंचाही माणूस सामील”, जरांगे पाटलांनी दिला कडक इशारा
हेही वाचा“नाहीतर तुमचेच बारा वाजतील”, लंकेंवर टिका करणाऱ्या सुजय विखेंचा घेतला पवारांनी समाचार
हेही वाचा…अखेर ठरलं..! भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाकडून उमेदवारी, आज ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…“वर्ध्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार यांनी केलं”, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“त्यांचा बैलगाड्याशी काहीही संबंध नाही, ते केवळ घोडीवर बसणारे”,आढळरावांकडून कोल्हेंची खरडपट्टी