पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता अशोक चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अशोक चव्हाण यांची गावात गाडी आली असता मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अशोक चव्हाण यांनी तिथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अनेक जणांवर गुन्हे दाखल केलेत. यावरूनच जरांगे पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला.
हेही वाचा…“हिंगोलीमध्ये महायुतीत धुसफूस, हेमंत पाटलांची उमेदवारी जाणार, शिंदे अन् भाजपच्या आमदारांमध्ये गुप्त बैठका
अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून आता देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा खेळ भरत आला आहे. थोडी माहिती मिळू द्या. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन सगळे जाहीरपणे सांगतो. जे जाहीर करणार आहे, ते अतिशय धक्कादायक असेल. सगळ्यांना त्यातून धक्काच बसेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा…विकसित भारताचे स्वप्न होणार साकार, “कामगारांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी,” मुरलीधर मोहोळांचे आवाहन
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जो काही धक्कादायक खुलासा करणार आहे. त्याची एक झलक तुम्हाला सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी चाल रचली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हे देखील सामील आहेत. कारण तो माणूस एकनाथ शिंदे यांचा आहे. कारण यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. गोरगरीब मराठ्यांवर फक्त अन्याय करायचा आहे. या सगळ्या गोष्टी गृहमंत्री त्यांचा पदाचा वापर करून करणार आहेत. तुमच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, तर त्यांच्यावरही ३५३ लावणार का ? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा“नाहीतर तुमचेच बारा वाजतील”, लंकेंवर टिका करणाऱ्या सुजय विखेंचा घेतला पवारांनी समाचार
हेही वाचा…अखेर ठरलं..! भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाकडून उमेदवारी, आज ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…“वर्ध्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार यांनी केलं”, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“त्यांचा बैलगाड्याशी काहीही संबंध नाही, ते केवळ घोडीवर बसणारे”,आढळरावांकडून कोल्हेंची खरडपट्टी
हेही वाचा…“विखे मनाने अगदीच भिकारी निघाले”, लंकेंवर टिका, शरद पवार गटाकडून सुजय विखेंचा समाचार