मुंबई : जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. महायुतीकडून उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर उन्मेष पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येईल असे सांगितलं जात होतं. मात्र आज जळगावमधून पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात आता नवा अध्याय बघायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर उन्मेष पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…अखेर ठरलं..! भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाकडून उमेदवारी, आज ठाकरे गटात प्रवेश
उन्मेष पाटील म्हणाले की, मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं. महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश केलाय. ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का ? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढचं माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने किमंत मिळाली नाही. अशीही भावना त्यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा…“वर्ध्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार यांनी केलं”, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल
दरम्यान, उन्मेष पाटील यांना लोकसभेत नाकारल्यानंतर त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येईल अशई चर्चा होती. मात्र त्याठिकाणी करण पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकारणात याची एकच चर्चा सुरू झाली आहे. जळगावसह ठाकरे यांनी आज चार उमेदवारांची घोषणा केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“समोर पाचशे कोटींचा मालक, अन् त्यांच्यासमोर आपल्याला लढायचं,” राणांच्या विरोधात कडूंनी ठोकला शड्डू
हेही वाचा…पक्ष फुटीत निष्ठावंत राहिल्या, आता लोकसभेची लॉटरी, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची वाघीण मैदानात
हेही वाचा…“भाजपने तिकीट नाकारलं, ठाकरे गटात प्रवेश, पण ठाकरेंनी घोषीत केला ‘हा’ वेगळाच उमेदवार”
हेही वाचा…“फडणवीसांनी दुसरी चाल रचलीय, शिंदेंचाही माणूस सामील”, जरांगे पाटलांनी दिला कडक इशारा
हेही वाचा“नाहीतर तुमचेच बारा वाजतील”, लंकेंवर टिका करणाऱ्या सुजय विखेंचा घेतला पवारांनी समाचार