अमरावती : अमरावती लोकसभेत महायुतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रहारचे बच्चू कडू आक्रमक झालेत. आज प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्याआधी बच्चू कडू यांनी अमरावतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी सभेत बोलतांना बच्चू कडू यांनी आता जर माघार घेतली तर पुन्हा पैशावाल्यांची जीत होणार. त्यामुळे सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. असे जाहीर आवाहन कार्यकर्त्यांनं केलं.
हेही वाचा…“वर्ध्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार यांनी केलं”, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, आता आपल्याकडे २० शिल्लक बाकी आहेत, झोपू नका, अन् कुणाला झोपू देऊ नका. आता जर माघार घेतली तर पुन्हा पैशावाल्यांची जीत होणार, पुन्हा सर्वसामान्यांची हार होणार. रोज काम केलं पाहिजे, खिशातले हजार रूपये, दोनशे रूपये खर्च केल्याशिवाय ही निवडणुक जिंकू शकत नाही. समोर पाचशे कोटींचा मालक आहे. अन् त्यांच्यासमोर आपल्याला लढायचं आहे. अनेक पक्ष त्यांच्या पंगतीत बसले आहेत. ती पंगत आता तोडायची आहे.
हेही वाचा…“त्यांचा बैलगाड्याशी काहीही संबंध नाही, ते केवळ घोडीवर बसणारे”,आढळरावांकडून कोल्हेंची खरडपट्टी
26 दिवस तुमच्या आमच्यासाठी स्वाभिमान टिकवून ठेवण्याचं काम करावं लागणार. अण्णा भाऊ साठे यांनी शाहिरांतून हिंदूस्तान उभं करण्याचं काम केलं. ज्योतिबा फुले यांनी त्यावेळेच्या सरकाराच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी घणाघात केला. मेळघाटातून राजकुमार आघाडी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. दऱ्या खोऱ्यातील एक एक आदिवासी बाहेर काढून प्रहाराच्या चिन्हावर मत टाकल्याशिवाय राहणार नाही. हिमंतीने आम्ही सोबत आलो आहोत. असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलतांना कडू म्हणाले की, उद्याच्या दिवस सत्तेतील लोक आम्हाला तुरूंगात टाकण्याची शक्यता आहे. तरीही देखील आम्ही तयार झालो आहोत. पंधरा ते वीस हजारांचा लीड घेतल्याशिवाय पायतली भिंगरी आता थांबणार नाहीय. सकाळी पाच वाजेपासून रात्री बारापर्यंत काम केलं पाहिजे. सर्व नेत्यांची सभा होतील, परंतु माझा कार्यकर्ता एक एक मतदारांपर्यंत पोहचला तर निवडणुक सोपी होईल.
READ ALSO :
हेही वाचा…पक्ष फुटीत निष्ठावंत राहिल्या, आता लोकसभेची लॉटरी, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची वाघीण मैदानात
हेही वाचा…“भाजपने तिकीट नाकारलं, ठाकरे गटात प्रवेश, पण ठाकरेंनी घोषीत केला ‘हा’ वेगळाच उमेदवार”
हेही वाचा…“फडणवीसांनी दुसरी चाल रचलीय, शिंदेंचाही माणूस सामील”, जरांगे पाटलांनी दिला कडक इशारा
हेही वाचा“नाहीतर तुमचेच बारा वाजतील”, लंकेंवर टिका करणाऱ्या सुजय विखेंचा घेतला पवारांनी समाचार
हेही वाचा…अखेर ठरलं..! भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाकडून उमेदवारी, आज ठाकरे गटात प्रवेश