हिंगोली : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषीत झाल्यानंतर महायुतीत मोठी धुसफुस झाली आहे. हिंगोली आणि हातगणंकलेतील उमेदवार बदलण्यात यावेत, अशी मागणी मित्र पक्षांनी जोरपणे धरून ठेवलीय. यामध्ये हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी तर थेट काल आपल्या समर्कांसह वर्षा बंगला गाठला होता. मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटील यांना शब्द दिला असला तरी आता हिंगोलीत उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…“भाजपने तिकीट नाकारलं, ठाकरे गटात प्रवेश, पण ठाकरेंनी घोषीत केला ‘हा’ वेगळाच उमेदवार”
हिंगोलीत हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपने कडवा विरोध केला आहे. भाजपच्या आढावा बैठकीतच हेमंत पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. त्यानंतर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उमेदवार बदलण्याची मागणी केलीय. आता याठिकाणी भाजपकडून बाबुराव कोहळीकर यांचं नाव चर्चेत आलं आहे.
हेही वाचा…“फडणवीसांनी दुसरी चाल रचलीय, शिंदेंचाही माणूस सामील”, जरांगे पाटलांनी दिला कडक इशारा
कोहळीकर यांनी याआधी २०१४ साली हदगाव हिमायत नगरमधून निवडणुक लढवली होती. मात्र त्याठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी बंडखोरी करत नगरमधून अपक्ष विधानसभा लढवली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केल्यानंतर राज्यात वेगाने हालचाली सुरू झाल्या. रात्री हेमंत पाटील आपल्या २०० ते ३०० समर्थकांसह वर्षा बंगल्यावर दाखल झालेत. रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांची हेमंत पाटलांसोबत चर्चा झाली. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत हेमंत पाटील यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना शब्द देऊन शांत केले होते.
READ ALSO :
हेही वाचा…प्रणिती शिंदेंचं सोलापुरात ताकद वाढली, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपचा पाठिंबा जाहीर
हेही वाचा…दिंडोरीत बंडखोरीचे मोठे संकट, महायुतीसह महाविकास आघाडीची वाढली डोकेदुखी
हेही वाचा..“दुर्दैवाने किमंत मिळाली नाही” अन्, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांनी भावनांना वाट करून दिली
हेही वाचा…“समोर पाचशे कोटींचा मालक, अन् त्यांच्यासमोर आपल्याला लढायचं,” राणांच्या विरोधात कडूंनी ठोकला शड्डू
हेही वाचा…पक्ष फुटीत निष्ठावंत राहिल्या, आता लोकसभेची लॉटरी, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची वाघीण मैदानात