मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान करण्याची तारीख अगदीच जवळ आली आहे. मात्र महायुतीत जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीय. भाजपसह मित्र पक्षांच्या कडाडून विरोधांमुळे शिंदेंना दिलेल्या उमेदवारी बदलण्याची वेळ आली आहे. तर विद्यमान खासदारांचा पत्ता कट करावा लागला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचा दबाव असल्याचे या सर्व घटनांवरून दिसायला लागले आहे. अशातच आता यावरून शरद पवार गटातील पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…दिंडोरीत बंडखोरीचे मोठे संकट, महायुतीसह महाविकास आघाडीची वाढली डोकेदुखी
हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या विरोधांमुळे बदलण्यात आली. तर यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला. दुसऱ्या बाजूला हातकणंगलेतून विद्यमान खासदार धैर्यशीलराव माने यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. तर रामटेकमधूनही शिंदेंच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट करून भाजपने जागा ताब्यात घेतली आहे. तर इतर काही जागांवर देखील शिंदेंवर भाजपमुळे नामुष्की येण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा..“दुर्दैवाने किमंत मिळाली नाही” अन्, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांनी भावनांना वाट करून दिली
या सर्व घटनांवरून प्रशांत जगताप यांनी भाजप आणि शिंदेंना डिवचलं आहे. शिंदे गटात गेलेल्यांना आता समजलं असले की काय थाट होता एकेकाळी. वाटाघाटी करायला दिल्लीतून लोक आपल्या नेत्याच्या पाायाशी येत होते. आता म्हणून मारून सेनापती बनलेले शिंदे शंभर वेळा दिल्लीचे रस्ते झिजवतात. चतकोर तुकडा टाकल्या सारखा जागा मिळतात. बरं एवढंच नाही, शिवसेनेला मिळालेल्या जागेवर उमेदवार कोण असेल हेही आता दिल्लीवालेच ठरवतात. दिलेली उमेदवीरीही कापतात अन् सेनापती म्हणून बसवलेले बोलके बाहुले सगळं कसं गुपगुमान ऐकतात. असा टोलाही त्यांनी लगावला. आहे.
दरम्यान, हिंगोलीतून तिकीट कापल्यानंतर भावना गवळी आक्रमक झाल्या आहेत. त्या आज आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर नाशिक, रत्नागिरी-सिंधुदूर्ग पालघर, कल्याण औरंगाबाद अशा शिंदे गटाकडे असलेल्या जागांवर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीत आता मोठे वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिंदे गटात गेलेल्यांना आता समजलं असेल…
काय थाट होता एकेकाळी, वाटाघाटी करायला दिल्लीतून लोक आपल्या नेत्याच्या पायाशी यायचे. आता हाणून मारून सेनापती बनलेले शिंदे शंभर वेळा दिल्लीचे रस्ते झिजवतात. चतकोर तुकडा टाकल्यासारख्या जागा मिळवतात.
बरं एवढंच नाही, शिवसेनेला मिळालेल्या जागेवर…— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) April 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मै मैरी झांशी नही दुंगी”, तिकीट कापलं, भावना गवळी आक्रमक, आज उमेदवारी अर्ज भरणार ?
हेही वाचा..“खासदार करणारेच शिवसैनिक श्रीकांत शिंदेंचा पराभव करतील,”उमेदवारी जाहीर, ठाकरेंची वाघीण कडाडली
हेही वाचा…“आम्ही त्यांच्याहून जास्त हार्ड बोलू शकतो,” कॉंग्रेसचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होऊन पत्ता कट होणार ; शिंदेंवर नामुष्की, हेमंत पाटलांच्या जागी ‘हा’ उमेदवार जाहीर ?
हेही वाचा…प्रणिती शिंदेंचं सोलापुरात ताकद वाढली, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपचा पाठिंबा जाहीर