ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यातच ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या बाजुला कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी वैशाली दरेकर विरूद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत अटळ झाली आहे.
हेही वाचा…“समोर पाचशे कोटींचा मालक, अन् त्यांच्यासमोर आपल्याला लढायचं,” राणांच्या विरोधात कडूंनी ठोकला शड्डू
वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे दोनवेळा खासदार झाले. पण आता त्यांची हॅट्रिक होणार नाही. त्यांना खासदार करणारे शिवसैनिक आता त्यांचा पराभव करतील. असा घणाघात त्यांनी केलाय.
दरम्यान, कल्याण लोकसभेची निवडणुक यंदा चांगलीच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. याठिकाणी ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना संधी दिलीय. २००९ साली वैशाली दरेकर या मनसेकडून लोकसभा निवडणुकीला उभ्या होत्या. तेव्हा त्यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली होती. तर २०१० साली कल्याण डोंबिवली मनपामधअये मनसे तर्फे त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कल्याण डोंबिवली मनपा पद भुषवले.
हेही वाचा…पक्ष फुटीत निष्ठावंत राहिल्या, आता लोकसभेची लॉटरी, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची वाघीण मैदानात
तर २००९ च्या अगोदर त्या शिवसेनेत होत्या. पुन्हा मनसे सोडून त्या शिवसेनेत आल्या. तर पक्ष फुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेतच राहिल्या अन् त्यांना आता लोकसभेची लॉटरी लागली.
READ ALSO :
हेही वाचा…“आम्ही त्यांच्याहून जास्त हार्ड बोलू शकतो,” कॉंग्रेसचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होऊन पत्ता कट होणार ; शिंदेंवर नामुष्की, हेमंत पाटलांच्या जागी ‘हा’ उमेदवार जाहीर ?
हेही वाचा…प्रणिती शिंदेंचं सोलापुरात ताकद वाढली, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपचा पाठिंबा जाहीर
हेही वाचा…दिंडोरीत बंडखोरीचे मोठे संकट, महायुतीसह महाविकास आघाडीची वाढली डोकेदुखी
हेही वाचा..“दुर्दैवाने किमंत मिळाली नाही” अन्, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांनी भावनांना वाट करून दिली