यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बुधवारी नाट्यपुर्ण घटना घडल्या. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे हिंगोलीतून दिलेले तिकीट कापण्यात आले. तर पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. मात्र दिलेले उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदेंवर आल्याने उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा..“दुर्दैवाने किमंत मिळाली नाही” अन्, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांनी भावनांना वाट करून दिली
हेमंत पाटील यांना जाहीर झालेल्या उमेदवारीला हिंगोलीतील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांचे तिकीट कापण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. पाटील यांनी उमेदवारीसाठी शिंदेंकडे जोरदार मोर्चेबांधणी केली होती. यावेळी तुमच्या हेमंतवर कोणताही अन्याय होणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मात्र काल अचानक त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने चर्चांना उधाण आलं. मात्र त्यानंतर लगचेच भावना गवळी यांच्या जागी यवतमाळ-वाशिममध्ये त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा…“समोर पाचशे कोटींचा मालक, अन् त्यांच्यासमोर आपल्याला लढायचं,” राणांच्या विरोधात कडूंनी ठोकला शड्डू
भावना गवळी यांच्या नावाला संजय राठोड यांनी विरोध केला होता. त्यावर राठोड यांनी लढावे असा त्यांना पक्षाकडून सुचविले गेले पण राठोड लढायला तयार नव्हेते. मै मैरी झांशी नही दुंगी, असे भावना गवळी म्हणाल्या होत्या. तिकीटासाठी गवळी गेले पाच दिवस मुंबईत तळ ठोकून होत्या. फडणवीस यांनाही त्या भेटल्या. मात्र त्यांना संधी नाकाण्यात आली. या मतदारसंघात आता जयश्री पाटील आणि उद्धवसेनेचे संजय देशमुख, वंचितचे सुभाष पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या २५ वर्षांपासून यवतमाळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे त्या आता चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मतदारसंघात जाऊन मीच उद्या अर्ज भरणार, अशी घोषणा त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. त्यामुळे यवतमाळ-वाशिममध्ये गवळी विरूद्ध पाटील अशी लढत होणार का ? हे उद्याच्या अर्ज भरण्यावरून स्पष्ट होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“खासदार करणारेच शिवसैनिक श्रीकांत शिंदेंचा पराभव करतील,”उमेदवारी जाहीर, ठाकरेंची वाघीण कडाडली
हेही वाचा…“आम्ही त्यांच्याहून जास्त हार्ड बोलू शकतो,” कॉंग्रेसचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होऊन पत्ता कट होणार ; शिंदेंवर नामुष्की, हेमंत पाटलांच्या जागी ‘हा’ उमेदवार जाहीर ?
हेही वाचा…प्रणिती शिंदेंचं सोलापुरात ताकद वाढली, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपचा पाठिंबा जाहीर
हेही वाचा…दिंडोरीत बंडखोरीचे मोठे संकट, महायुतीसह महाविकास आघाडीची वाढली डोकेदुखी