धाराशिव : गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यानंतर अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी धाराशीव लोकसभा मतदारसंघातून विक्रम काळे यांच्यासह अनेकांची नावे समोर आली होती. मात्र आता अजित पवारांनी भाजपच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अर्चना पाटील यांचा सामना विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत होणार आहे.
हेही वाचा…“दिल्ली बहुत दूर हैं बच्चू…! श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत”
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी राजकीय उलथाफालत होऊ लागल्या आहेत. अशातच आता ठाकरे गटातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी महायुतीकडून नवी चाल खेळली जात आहेत. अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निंबाळकरांच्या विरोधात उतरवण्यात आलं आहे. आज त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
हेही वाचा…“ठाकरेंवर दबाव टाकण्याची कोणाची हिमंत झाली नाही, आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो..!” दानवेंनी डिवचलं
राष्ट्रवादीकडून माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार इच्छुक असले तरी बिराजदार हे प्रभावी उमेदवार ठरू शकत नाहीत, म्हणून त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर होते, पण आणखी चार वर्षे कालावधी बाकी असल्याने काळे यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा आणि ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह अजित पवार यांनी धरला पण राणा पाटील यांनी आपले भाजपमध्ये व्यवस्थित बस्तान बसल्याचे सांगून नकार दिला. यातून मार्ग काढण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
दरम्यान, धाराशीव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आलीय. यातच आता त्यांच्यासमोर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील याचं आव्हान असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नवनीत राणांना बजरंग बलीचा आशीर्वाद”, बहुमताने निवडून येतील,” देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
हेही वाचा…“आठ दिवस ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, मग मी..” संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा..‘धक्कादायक बातमी…! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला, बीड हादरलं…
हेही वाचा…भाजप आमदाराची पत्नी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढणार ? अर्चनाताई पाटील अजितदादा गटात दाखल ?
हेही वाचा…“अमोल कोल्हेंना भावनिक राजकारण का करावं लागतंय ?”, आढळराव पाटलांनी कोल्हेंची केली पोलखोल