हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. ऐनवेळी उमेदवार बदलल्याने हिंगोलीच्या लोकसभेकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळेच बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: एकनाथ शिंदे यांनी रॅलीला संबोधित केले. यावेळी महायुतीतील पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी बोलतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेसवर जोरदार घणाघात चढवला.
हेही वाचा…“अमोल कोल्हेंना भावनिक राजकारण का करावं लागतंय ?”, आढळराव पाटलांनी कोल्हेंची केली पोलखोल
एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे कोणताही विकासाचा अजेंडा नसलेली दिशाहीन कॉंग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांची महाविकास आघाडी आणि दुसरीकडे देशाला विकसित भारत बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यातील हा सामना असून हिंगोली आणि वाशीम-यवतमाळ या दोन्ही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणून मोदी यांचे हात बळकट करायचे असा निर्धार शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा…“दिल्ली बहुत दूर हैं बच्चू…! श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत”
दरम्यान, कोहळीकर हे सर्वसामन्य शेतकरी कुटुंबातील असून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार चालून आपण यंदा त्यांना उमेदवारी दिली आहे. कारण ‘राजा का बेटा राजा नही बनेगा, वही राजा बनेगा जो काम करेगा’ असं आपल्या शिवसेनेचे सूत्र असून त्यानुसार त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे यासमयी सांगितले.
यावेळी आमदार नामदेव ससाणे, आमदार संतोष बांगर, भीमराव गेडाम, तानाजी मुटकुळे, शिवाजी माने, गजानन घुगे, बी.डी.बांगर, फुलाजी शिंदे, नितीन भुतडा, मंगेश हडसनरीकर, रेखाताई देवकाते, शीतल भांगे, अमित गीते, हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंद जाधव तसेच महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, धाराशिवमध्ये निंबाळकरांसमोर मोठं आव्हान
हेही वाचा…“नवनीत राणांना बजरंग बलीचा आशीर्वाद”, बहुमताने निवडून येतील,” देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
हेही वाचा…“आठ दिवस ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, मग मी..” संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा..‘धक्कादायक बातमी…! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला, बीड हादरलं…
हेही वाचा…भाजप आमदाराची पत्नी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढणार ? अर्चनाताई पाटील अजितदादा गटात दाखल ?